Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघणं 'या' गंभीर आजाराचं ठरू शकतं कारण, जाणून घ्या नुकसान!

जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघणं 'या' गंभीर आजाराचं ठरू शकतं कारण, जाणून घ्या नुकसान!

Health Tips : अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघणं हे आरोग्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:59 IST2025-01-09T10:57:48+5:302025-01-09T10:59:58+5:30

Health Tips : अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघणं हे आरोग्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं.

Watching TV or phone while eating can lead to diabetes, obesity and indigestion | जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघणं 'या' गंभीर आजाराचं ठरू शकतं कारण, जाणून घ्या नुकसान!

जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघणं 'या' गंभीर आजाराचं ठरू शकतं कारण, जाणून घ्या नुकसान!

Health Tips : आजकाल लोक लाइफस्टाईलसंबंधी इतक्या चुका करतात, ज्यामुळे त्यांना आरोग्यासंबंधी अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. भरपूर लोकांना जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल फोन बघण्याची सवय असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही सवय बघायला मिळते. जेवण करताना टीव्ही-फोन बघणं हे आजच्या बिझी शेड्युलमुळे होतं. अशात लोक एकाच वेळी वेगवेगळी कामं करण्याच्या प्रयत्नात असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघणं हे आरोग्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं. डॉक्टर रोहिणी सोमनाथ पाटील यांनी याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

जेवण करताना टीव्ही बघण्याचे नुकसान

जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघावा की नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर याचं उत्तर 'नाही' असं आहे. कारण जेवण करताना या गोष्टी केल्या तर जेवणावर लक्ष केंद्रीत करता येत नाही. अशात शरीर डायजेस्टिव्ह एंझाइम्स योग्यपणे रिलीज करू शकत नाही. ज्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होत नाही. गट आणि मेंदुचा थेट संबंध असतो. जर तुम्ही योग्य वेळेवर योग्य गोष्टी खात नसाल तर, ब्लोटिंग, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटदुखी अशा समस्या होतात. अशात तुम्ही कोणत्याही कामात योग्यपणे फोकस करू शकत नाहीत. शरीरात थकवा जाणवतो आणि चिडचिडपणाही वाढतो.

जेवण करताना काय करावे काय करू नये?

१) जेवण करताना केवळ जेवणावर लक्ष द्यावं. टीव्ही किंवा फोन अजिबात बघू नये.
२) जेवण रात्री उशीरा अजिबात करू नये

३) एक खास कमीत कमी १८ ते २० वेळा चावून खावा. यानं अन्न चांगलं पचन होतं.

४) जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर लगेच खूप पाणी पिऊ नये. असं केल्यास पचनक्रिया प्रभावित होते.

टीव्ही बघत जेवण केल्यास या समस्यांचा धोका

लठ्ठपणा वाढतो

जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघत असाल तर यामुळे तुम्ही जेवणावर योग्य फोकस करू शकत नाही. सोबतच ओव्हरईटिंग करू शकता. ज्यामुळे तुमचं वजन वाढले आणि त्यानंतर वेगवेगळे आजार शरीरात घर करतील. टीव्ही बघत जेवल्यानं अन्न व्यवस्थित पचन होत नाही, ज्यामुळेही वजन वाढतं.

पचनासंबंधी समस्या

टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवम करत असाल तर तुम्हाला पचन तंत्रासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपण जे खातो ते व्यवस्थित चावून न खाल्ल्यास पचन चांगलं होत नाही. अशात बद्धकोष्ठता, पोटदुखी, अपचन अशा समस्या होऊ शकतात.

डायबिटीसचा धोका

डायबिटीस एक गंभीर आणि ठोस उपचार नसलेला एक आजार आहे. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. जर जेवण करताना तुम्ही टीव्ही किंवा फोन बघत असाल तर डायबिटीसचा धोका अनेक पटीनं वाढतो. या सवयीमुळे मेटाबॉलिज्म स्लो होतं. आणि अशात वजन वाढतं. वजन वाढलं की, डायबिटीसचा धोका अधिक असतो.

एकंदर काय तर तुम्ही जेवण करताना टीव्ही किंवा फोन बघू नये. यानं शरीराचं नुकसान होतं. अन्नातील पोषक तत्व शरीराला योग्यपणे मिळत नाही. त्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या होतात. 
 

Web Title: Watching TV or phone while eating can lead to diabetes, obesity and indigestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.