Join us   

जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यावरच पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात, पाणी किती-कधी प्यावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 12:58 PM

Water during meals: Does it disturb digestion? जेवताना पाणी प्यावं की न प्यावं यावरुन बरेच वाद दिसतात, त्यातलं खरं काय?

आपले आरोग्य कसे राहील हे आपण अन्न कसे खातो यावर अवलंबून असते. काही लोकांना जेवत असताना पाणी पिण्याची सवय असते. एक घास त्यानंतर एक घोट पाण्याचा, असे करत काही लोकं जेवतात. ज्यामुळे अन्न गिळायला सोप्पे जाते. पण ही बाब आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे आरोग्याला नुकसान पोहचते.

यासंदर्भात, भारतातील प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी, आपण जेवणादरम्यान पाणी पिणे का टाळावे, जेवत असताना पाणी प्यायल्याने आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात. याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे(Water during meals: Does it disturb digestion? ).

जेवताना पाणी का पिऊ नये

जेवताना पाणी का पिऊ नये, यासाठी आधी पचनाची प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. अन्न तोंडात गेल्यावर आपण चघळायला सुरुवात करतो. त्यानंतर, ग्रंथी लाळ निर्माण करू लागते. आपल्या लाळेमध्ये एंजाइम असतात, जे अन्नाचे भाग करतात. यानंतर हे एंझाइम्स पोटातील आम्लीय जठराच्या रसात मिसळून जाड द्रव तयार करण्यास सुरवात करतात. हे द्रव पदार्थ लहान आतड्यांमधून जातात आणि पोषक द्रव्य शोषून घेण्यास सुरवात करतात.

बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात..

पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो

पाणी नियमित व भरपूर प्यावे असा सल्ला मिळतो. पाणी अधिक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. यासह पचनसंस्था देखील सुधारते. पण जेवताना पाणी पिणे चांगले नाही. कारण अन्नासोबतच द्रवपदार्थ आपल्या पचनाला हानी पोहोचवते.

ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय

लठ्ठपणाची समस्या उद्भवते

जेवत असताना पाण्याचे सेवन केल्याने, पोटातील आम्ल आणि पाचक एंजाइम पातळ होतात, ते पचविणे सोपे जाते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. उलट जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेत समस्या निर्माण होतात. याचा आणखी एक तोटा म्हणजे पोट फुगायला लागतं आणि हळूहळू लठ्ठपणाची समस्या उद्भवते.

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

बहुतांश आरोग्यतज्ञ सांगतात, अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यावे, यामुळे आरोग्य सुधारेल आणि पचनक्रियाही चांगली होईल.

टॅग्स : पाणीहेल्थ टिप्सआरोग्य