Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Water Expiry Date : सीलबंद पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते? एक्सपायर झालेलं पाणी प्यायलात तर.....

Water Expiry Date : सीलबंद पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते? एक्सपायर झालेलं पाणी प्यायलात तर.....

Water Expiry Date : अनेकवेळा या पाण्याच्या बाटलीवरील एक्स्पायरी डेट पाहून मनात शंका येते. अशा स्थितीत कालबाह्य झालेले पाणी पिता येते का, असा प्रश्न आपल्या मनात येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:50 AM2021-12-20T11:50:07+5:302021-12-20T12:30:26+5:30

Water Expiry Date : अनेकवेळा या पाण्याच्या बाटलीवरील एक्स्पायरी डेट पाहून मनात शंका येते. अशा स्थितीत कालबाह्य झालेले पाणी पिता येते का, असा प्रश्न आपल्या मनात येतो.

Water Expiry Date : Do plastic bottles expire why expiry date written on plastic bottles | Water Expiry Date : सीलबंद पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते? एक्सपायर झालेलं पाणी प्यायलात तर.....

Water Expiry Date : सीलबंद पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते? एक्सपायर झालेलं पाणी प्यायलात तर.....

पाण्याशिवाय आपले जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणग्यांपैकी एक आहे. त्यामुळे पाणी वाचवणं खूप महत्वाचं आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असूनही  यातील ९७ टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे. अशा स्थितीत केवळ ३ टक्केच पाणी शिल्लक आहे. (Plastic bottles expire why expiry date written on plastic bottles)

जर तुम्ही पाण्याची बाटली विकत घेऊन प्यायली आणि त्यावर एक्सपायरी डेट दिसली तर नक्कीच थोडी जास्त भीती वाटते. आपल्या सर्वांना माहित आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे येत्या काही वर्षांत जवळपास सर्वच देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. त्याच वेळी, तज्ञ म्हणतात की तिसरे महायुद्ध फक्त पाण्याबद्दल असेल. अशा स्थितीत  पाण्याच्या बाटलीवरील एक्सपायरी डेटचं काय महत्व असतं, जाणून घेऊया.

एक्सपायर झालेलं पाणी पिऊ शकतो का?

जेव्हा आपण घराबाहेर जातो तेव्हा पिण्याचे पाणी सोबत नेणं थोडं कठीण होतं. अशा परिस्थितीत आपण अनेकदा बाजारातून पॅकबंद पाण्याच्या बाटल्या विकत घेतो. मात्र अनेकवेळा या पाण्याच्या बाटलीवरील एक्स्पायरी डेट पाहून मनात शंका येते. अशा स्थितीत एक्सपायर झालेले पाणी पिता येते का, असा प्रश्न आपल्या मनात येतो.

हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल. किमान ६ महिने पाणी खराब होत नाही. जेव्हा पाणी जास्त तापमान आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले जात नाही तेव्हा पाण्याची नासाडी देखील होते. अशा स्थितीत जेव्हा पाणी कार्बोनेटेड होते तेव्हा त्याची चव बदलते, तसेच त्यातून वायू बाहेर पडू लागतो. पण तरीही शास्त्रज्ञ म्हणतात की पाणी इतक्या सहजासहजी एक्सपायर होत नाही. साध्या पाण्याच्या तुलनेत पॅकेज केलेले पाणी कालबाह्य किंवा खराब होऊ शकते आणि त्यामागील कारण म्हणजे प्लास्टिकची बाटली ज्यामध्ये पाणी ठेवले जाते. साधारणपणे, प्लास्टिकच्या बाटलीत साठवलेल्या पाण्याची एक्सपायरी डेट 2 वर्षांपर्यंत असू शकते.

ही पाण्याची बाटली सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यावर बाटलीत असलेले पॉलीथिलीन टेरेफ्थालेट पाण्यात विरघळू लागते. त्यामुळे पाण्याच्या चवीवर तर परिणाम होतोच, पण त्यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचते. याव्यतिरिक्त, पॅकेज केलेले पाणी विकणाऱ्या बहुतेक कंपन्या सोडा निर्मात्यांद्वारे वापरल्या जाणार्‍या मशीनचा वापर करतात. त्यामुळेच पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट असते.

एक्सपायर्ड पाणी पिण्याचं नुकसान

एक्सपायर्ड झालेल्या पाण्याच्या बाटलीतील पाणी प्यायल्यास प्रजोत्पादनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय न्यूरोलॉजिकल आणि इम्यून सिस्टमलाही नुकसान होते. याशिवाय या पाण्यातून काही प्रकारचा वासही येऊ शकतो.

Web Title: Water Expiry Date : Do plastic bottles expire why expiry date written on plastic bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.