Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वॉटर फास्टिंगचा नवा ट्रेण्ड धोक्याचा! संशोधन सांगते - वजन झटपट कमी झाले तरी...

वॉटर फास्टिंगचा नवा ट्रेण्ड धोक्याचा! संशोधन सांगते - वजन झटपट कमी झाले तरी...

Water Fasting: Benefits and Risks वॉटर फास्टिंगद्वारे वजन झपाट्याने कमी करता येते असा दावा असला तरी त्याचे परिणाम मात्र बरे नव्हेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2023 01:33 PM2023-07-04T13:33:05+5:302023-07-04T13:33:57+5:30

Water Fasting: Benefits and Risks वॉटर फास्टिंगद्वारे वजन झपाट्याने कमी करता येते असा दावा असला तरी त्याचे परिणाम मात्र बरे नव्हेत.

Water Fasting: Benefits and Risks | वॉटर फास्टिंगचा नवा ट्रेण्ड धोक्याचा! संशोधन सांगते - वजन झटपट कमी झाले तरी...

वॉटर फास्टिंगचा नवा ट्रेण्ड धोक्याचा! संशोधन सांगते - वजन झटपट कमी झाले तरी...

लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होतात. मुख्य म्हणजे बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण जिम, योगा व डाएटचा आधार घेतो. सध्या वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग ही पद्धत चर्चेत आहे.

'शिकागो इलिनॉय युनिव्हर्सिटी'च्या संशोधनानुसार, वॉटर फास्टिंगमुळे वजन झपाट्याने कमी होते. पण हे फार काळ टिकत नाही. परंतु, पोट आणि पचनाच्या संबंधित लहान-मोठे आजार दूर होतात. यासह रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे(Water Fasting: Benefits and Risks).

कॅलरीज कमी होतात

वॉटर फास्टिंग हे संपूर्ण संशोधन काइन्सियोलॉजी आणि पोषण विभागाच्या प्राध्यापक क्रिस्टा वर्डी यांच्या नेतृत्वात पार पडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर, वॉटर फास्टिंग या पद्धतीचा अवलंब करून पाहू शकता. ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे कॅलरीज झपाट्याने कमी होतात. यासह पोटातील पचनाच्या संबंधित समस्या दूर होतात.''

स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा

ते पुढे म्हणतात, ''डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस वॉटर फास्टिंग करू नये. वॉटर फास्टिंग डॉक्टरांच्या देखरेखेखाली करावी. वजन कमी करण्याची ही पद्धत युरोपमध्ये फार फेमस आहे. यात लोकं ज्यूस किंवा सूपचे सेवन करून फास्टिंग करतात, मुख्य म्हणजे लिक्विड पदार्थांचे सेवन करतात.''

संशोधकांना असे आढळून आले की, उपवासामुळे काही काळ वजन कमी होण्यास मदत होते. पाच दिवस वॉटर फास्टिंग केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. ज्यांनी २० दिवसांपर्यंत ही प्रोसेस अवलंबली आहे. त्यांचे ७ ते १० टक्क्यांपर्यंत वजन कमी झाले आहे. यात टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहग्रस्त रुग्णांचा देखील समावेश होता. त्यांनी इन्शुलिन डोस घेऊन वॉटर फास्टिंग केली. मुख्य म्हणजे याचा त्यांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही.

वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

फास्टिंग करताना लोकांना भूक लागणे, डोकं दुखणे, निद्रानाश अशी समस्या उद्भवते. यात मेटाबॉलिक ऍसिडोसिस किंवा मृत्यू यासारख्या गोष्टी अभ्यासात घडल्या नाहीत. मुख्य म्हणजे यात सहभागी झालेल्या लोकांचे वजन कमी झाले.

संपूर्ण संशोधनाचे निष्कर्ष

वॉटर फास्टिंगमुळे वजन लवकर कमी होते. परंतु, ही बाब जास्त काळ टिकत नाही. असा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. त्यामुळे संशोधकाचे असे मत आहे की, वॉटर फास्टिंग करण्याऐवजी आधुनमधून उपवास करणे अधिक प्रभावी ठरेल, आणि त्याचा परिणामही दीर्घकाळापर्यंत दिसून येईल.

Web Title: Water Fasting: Benefits and Risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.