उन्हाळ्यात (Summer Special) पाणी पीत राहणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञ उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. काही प्रमाणात पाणी यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, स्नायू आणि हाडे तसेच शरीराच्या इतर अनेक अवयवांमध्ये देखील साठवले जाते (Drinking Water). हे त्यांचे कार्य चालवून ठेवण्यास मदत करते.
परंतु एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे याविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समजुती आहेत. काही म्हणतात ८ ग्लास पाणी प्यावे, तर काही ३ ते ४ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात (Health Care). पण उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी किती पाणी पिण्याची गरज आहे? याची माहिती न्यूट्रिशनिस्ट विनीत कुमार यांनी दिली आहे(Water: How much should you drink every day? Especially in summer).
यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट सांगतात, 'एखाद्या व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यावे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. त्या व्यक्तीचे वय, ती व्यक्ती किती शारीरिक हालचाली करते, हवामानाचे तापमान आणि तो दिवसभरात काय खातो-पितो, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.'
मूत्रपिंडाचे विकार टाळा, प्या एक आयुर्वेदिक काढा! किडनी डिटॉक्सचा सोपा घरगुती उपाय
ते पुढे म्हणतात, 'जर आपल्याला दिवसात किती पाणी प्यावे हे जाणून घ्यायचं असेल तर, तुमच्या लघवीचा रंग पाहून ठरवा. जर आपली लघवी गडद पिवळ्या रंगाची असेल तर, समजून जा आपण पुरेसे पाणी पीत नाही. लघवीचा रंग किंचित पिवळसर असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत आहात. जर आपल्या लघवीला रंग नसेल तर, आपण योग्य प्रमाणात पाणी पीत आहात याचे संकेत आहे.'
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी काय करावे?
लघवीच्या रंगावरून आपण आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे, हे ओळखू शकता. कारण तुम्ही एका दिवसात किती पाणी प्यावे याने काही फरक पडत नाही. त्याऐवजी, तुम्ही किती द्रवपदार्थ, फळे, भाज्या खाता यावर देखील शरीर हायड्रेट आहे की नाही हे कळून येते. शिवाय उन्हाळा असो किंवा हिवाळा नियमित ८ ते १० पाणी प्या. यामुळे शरीरात कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही.