Join us   

पाणी नेमकं कधी आणि किती प्यावं? दिवसभरात किमान ७ वेळा पाणी पिण्याचे वाचा ‘हे’ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 4:58 PM

Water: How much should you drink every day in Summer : उन्हाळ्यात 'या' ७ वेळात पाणी पिणं गरजेचं; शरीर हायड्रेट ठेवायचं असेल तर..

खराब पचन, चक्कर येणे, घाम फुटणे, मूत्राशयाचा संसर्ग, सांधेदुखी, बद्धकोष्ठता, अशक्तपणा यासह इतर समस्या पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात उद्भवतात (Summer Special). शरीराच्या प्रत्येक अवयवाला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पण बऱ्याचदा लोकांना दिवसात किती पाणी प्यायला हवे याबद्दल शंका असते (Water Intake).

हार्वर्ड वेबसाईटनुसार, 'पाण्याची गरज शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. पण दिवसभरात पाणी कधी प्यावे हे अनेकांना ठाऊक नसते. जर शरीर हायड्रेट ठेवायचं असेल तर, पाणी पिण्याच्या ७ सर्वोत्तम वेळा पाळा. यामुळे शरीर हायड्रेट राहील, आणि आरोग्य सुधारेल. पण दिवसातून किती वेळा पाणी प्यावे, याची माहिती न्यूट्रिशनिस्ट सिमरन वोहरा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे(Water: How much should you drink every day in Summer).

पाणी पिण्याची उत्तम वेळ

- सकाळी उठल्यानंतर

- व्यायामानंतर

- आंघोळ करण्यापूर्वी

इडली दडस होते-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट

- रात्री झोपण्यापूर्वी

- थकल्या जाणवण्यापूर्वी

- आजारी पडल्यानंतर

योग्य वेळी पाणी पिण्याचे फायदे

पोषणतज्ज्ञांच्या मते, 'सकाळी पाणी प्यायल्याने अंतर्गत अवयव सक्रिय होतात. बऱ्याचदा व्यायामानंतर हृदयाचे ठोके वाढतात. ते ठोके सामान्य करण्यास मदत करते. शिवाय आंघोळ करण्यापूर्वी पाण्यापूर्वी बीपी कमी होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे थकवा आणि आजारपणात पाणी शरीराला रिचार्ज आणि हायड्रेट करते.

पाण्याशिवाय आपण काय पिऊ शकता?

हायड्रेशनसाठी पाणी पिणे आवश्यक आहे. परंतु, जर आपल्याला सतत पाणी पिण्याची इच्छा नसेल तर, आपण दुसरे पेय देखील पिऊ शकता. आपण पाण्याऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी, ओआरएस सोल्यूशन, सूप, हर्बल चहा इत्यादी देखील घेऊ शकता. या गोष्टी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतील.

टॅग्स : समर स्पेशलहेल्थ टिप्सआरोग्य