Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > व्हायरल तापाने खूप अशक्तपणा येतो, गळाल्यासारखं वाटतं? फास्ट रिकव्हरीसाठी खा ५ पदार्थ

व्हायरल तापाने खूप अशक्तपणा येतो, गळाल्यासारखं वाटतं? फास्ट रिकव्हरीसाठी खा ५ पदार्थ

Health tips: कोरोनाची साथ ओसरली तरी व्हायरल इन्फेक्शन अजूनही आहेच आणि ते कायम असणार.. त्यामुळे असं जर व्हायरल इन्फेक्शन (viral fever) झालं तर काय आहार असावा, हे जाणून घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 04:56 PM2022-03-01T16:56:39+5:302022-03-01T16:59:46+5:30

Health tips: कोरोनाची साथ ओसरली तरी व्हायरल इन्फेक्शन अजूनही आहेच आणि ते कायम असणार.. त्यामुळे असं जर व्हायरल इन्फेक्शन (viral fever) झालं तर काय आहार असावा, हे जाणून घ्या..

Weakness due to viral fever? then you must have these 5 food items in your diet to boost your immunity | व्हायरल तापाने खूप अशक्तपणा येतो, गळाल्यासारखं वाटतं? फास्ट रिकव्हरीसाठी खा ५ पदार्थ

व्हायरल तापाने खूप अशक्तपणा येतो, गळाल्यासारखं वाटतं? फास्ट रिकव्हरीसाठी खा ५ पदार्थ

Highlightsव्हायरल फिव्हर असला तरी त्यामुळे होणारा त्रास काही कमी नसतोच. म्हणूनच तर या दुखण्यातून लवकर सावरण्यासाठी आहारात असा काही बदल करा..

कोरोनाची साथ आता बरीच आटोक्यात आली आहे. त्यामुळे आपण सगळे निर्धास्त झालेलो आहोत. पण कोरोनाची भीती नसली तरी वातावरण बदललं, ऋतू बदलला की व्हायरल ताप येण्याची साथ वाढीस लागतेच.. आता पुन्हा एकदा वातावरण बदलत आहे. थंडी ओसरून गरमीची चाहूल लागली आहे. अशा वेळी आपल्या आसपास आजारी पडणाऱ्या मंडळींचं प्रमाणही वाढलेलं दिसतंय.

 

व्हायरल फिव्हर (viral infection) असला तरी त्यामुळे होणारा त्रास काही कमी नसतोच. अनेक जणांचा हा त्रास तर महिना- महिना लांबतो. सारखा अशक्तपणा (weakness due to viral fever) जाणवतो. म्हणूनच तर या दुखण्यातून लवकर सावरण्यासाठी आहारात असा काही बदल करा..(How to improve immunity after viral fever)

 

आजारातून चटकन सावरण्यासाठी आहारात करा असा बदल
How to improve immunity after viral fever
१. नारळपाणी

शरीराचा थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी नारळपाणी पिणे हा अतिशय उत्तम उपाय आहे.. कारण त्यामध्ये असणारे विशिष्ट ॲसिड प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. विविध आजारांशी लढण्याची ताकद नारळ पाण्यामुळे मिळते. शरीरातील पाणी पातळी वाढून शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठीही नारळ पाण्याचा उपयोग होतो. शरीर हायड्रेटेड राहिले की आपोआपच तरतरी येते. 

 

२. सुकामेवा 
आजारातून नुकत्याच उठलेल्या अशक्त व्यक्तीसाठी सुकामेवा खाणे फायदेशीर ठरते. सुकामेवा अतिशय आरोग्यवर्धक असून तूप घालून केलेले सुकामेव्याचे लाडू अशक्त व्यक्तीसाठी इम्युनिटी बुस्टर ठरतात. इम्युनिटी वाढविणारे झिंक आणि ॲण्टीऑक्सिडंट्स सुकामेव्यात भरपूर असतात.

 

३. केळी
केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे आजारी व्यक्तीच्या शरीरातील उर्जेची झीज भरून काढण्यासाठी केळी खाणे उपयुक्त ठरते. केळीमध्ये पोटॅशियम, मँगनीज, फॉलिक ॲसिड, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. केळीतून लोह देखील भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळेही अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

 

४. पालेभाज्या
अशक्त व्यक्तींना हिरव्या पालेभाज्या अधिकाधिक खाण्यास द्याव्या. यामुळे अशक्तपणा कमी करता येऊ शकतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम, बीटा कॅरोटीन आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेही अंगाता उर्जा निर्माण होते.

 

५. तुळशीचा काढा
कोणत्याही प्रकारचा संसर्ग बरा करण्यासाठी तुळस अतिशय गुणकारी ठरते. व्हायरल फिव्हरदेखील संसर्गामुळेच झालेला असतो. त्यामुळे हा त्रास बरा करून अंगात तरतरी यावी म्हणून आजारी व्यक्तींना तुळशीचा काढा द्यावा.. 


 

Web Title: Weakness due to viral fever? then you must have these 5 food items in your diet to boost your immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.