Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री ब्रा न घालता झोपण्याने महिलांना काही आजार होतात का? डॉक्टर सांगतात..

रात्री ब्रा न घालता झोपण्याने महिलांना काही आजार होतात का? डॉक्टर सांगतात..

Wearing a Bra at Night: Is Sleeping in a Bra Harmful? महिलांचे आरोग्य आणि त्यासंदर्भातले प्रश्न मोकळेपणानं बोलणं शक्य नसल्यानं महिला अनेक आजार सहन करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 04:01 PM2023-03-02T16:01:52+5:302023-03-02T16:03:11+5:30

Wearing a Bra at Night: Is Sleeping in a Bra Harmful? महिलांचे आरोग्य आणि त्यासंदर्भातले प्रश्न मोकळेपणानं बोलणं शक्य नसल्यानं महिला अनेक आजार सहन करतात

Wearing a Bra at Night: Is Sleeping in a Bra Harmful? | रात्री ब्रा न घालता झोपण्याने महिलांना काही आजार होतात का? डॉक्टर सांगतात..

रात्री ब्रा न घालता झोपण्याने महिलांना काही आजार होतात का? डॉक्टर सांगतात..

रात्री झोपताना अनेक महिला ब्रा काढून टाकतात. अनेकींना त्यानं बरं, मोकळंढाकळं वाटतं. तो सवयीचाही भाग असतो. दिवसभर घट्ट ब्रा घातल्याने होणारा त्रासही कमी होतो. मात्र रात्री झोपताना ब्रा काढून टाकली तर आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतात किंवा नाही काढली तरी होतात असे समज गैरसमज याविषयात दिसतात. यासंदर्भात नेमकं खरं काय? ख‌रंच आरोग्यावर दुष्परिणाम होतो का? काय नक्की खरं(Wearing a Bra at Night: Is Sleeping in a Bra Harmful?).

फायदे तोटे नेमके काय?

हिरानंदानी हॉस्पिटलच्या ब्रेस्ट ऑन्को सर्जरी कन्सल्टंट डॉ. विधी शाह यांनी नेटवर्क १८ ला दिलेल्या माहितीत त्या म्हणतात, ''रात्री ब्रा घालून झोपायला काहीच हरकत नाही. ब्रामुळे शरीराला काही त्रास होतो असे आतापर्यंतच्या कोणत्याही संशोधनातून समोर आलेले नाही. किंवा ब्रा घातल्याने किंवा काढून झोपल्याने, स्तनाच्या निगडीत आजार होतील असेही काही नाही. नको असेल, सोयीचे वाटत असेल तर ब्रा काढून झोपलं तरी चालतं. सोयीचं असेल तर रात्रीही ब्रा घालून आरामात झोपू शकता. फक्त शरीराच्या आकारानुसार योग्य साइजची ब्रा निवडावी. घट्ट किंवा अगदी सैल ब्रा घालू नये.''

ब्रा घालणे महत्वाचे का आहे?

ब्रा घालणे महिलांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण यामुळे शरीराचे पोश्चर योग्य राहते. छातीलाही आधार मिळतो. 

कोणत्या प्रकारची ब्रा घालावी?

ब्रा खरेदी करताना नेहमी आरामदायी ब्राला प्राधान्य द्यायला हवे. ब्रा खूप घट्ट किंवा खूप सैल नसावी. काही महिला रात्री लूज ब्रा घालून झोपतात, पण असे करणे योग्य नाही. यामुळे स्तनाला योग्य आधार मिळत नाही. आपण रात्री पॅडेड किंवा अंडरवायर ब्रा देखील परिधान करू शकता.

पिरिअड पॅण्ट हा प्रकार काय असतो? महिलांना आरोग्याच्या दृष्टीने ते वापरणे फायद्याचे की तोट्याचे?

ब्रा कधी घालू नये?

स्तनाग्रामध्ये त्रास जाणवत असेल किंवा, कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल तर, ब्रा घालणे टाळा. जर स्तनावर सूज येत असेल तरी घट्ट ब्रा घालू नका.

Web Title: Wearing a Bra at Night: Is Sleeping in a Bra Harmful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.