Join us   

रोज रात्री ब्रा न घालता झोपल्यास काय होते? ब्रा का घालावी, कधी घालू नये? डॉक्टर सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 1:54 PM

Wearing a Bra at Night Is Sleeping in a Bra : रात्रीच्यावेळी ब्रा घालून झोपण्यात काही अडचण नाही. रात्री ब्रा घालून झोपल्याने शारीरिक समस्या उद्भवतात, असा कोणताही रिसर्च समोर आलेला नाही.

महिला आपल्या आवडीनुसार ड्रेसची निवड करतात. पण अंडरगारमेंट्स बद्दल बोललं जातं तेव्हा अनेक स्त्रिया अंडर गारमेंट्सच्या निवडीबाबत चुकतात.(Women's Health) ब्रा चे फॅब्रिक कसे असाव हे कळणं, अंडर गारमेंट्सच्या वापराने कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. (Is it Healthy to Wear Bra while Sleeping night) घट्ट ब्रा निवडल्यास  स्तनांच्या ब्लड सर्क्युलेशनवर निश्चितच याचा परिणाम होतो आणि ब्रा जास्त सैल बसत असेल तर स्तनांना सपोर्ट मिळत नाही.

काही महिला शरीर रिलॅक्स राहावे यासाठी रात्रीच्यावेळी ब्रा घालत नाहीत तर काहींना ब्रा घालून झोपण्यातच कंम्फर्ट वाटतो. रात्री ब्रा काढून  का झोपावं, यामुळे शरीराला काही नुकसान पोहोचते का याबबत सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. डॉ. विधी शहा यांनी एका वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Wearing a Bra at Night Is Sleeping in a Bra Harmful)

रात्री ब्रा घालावी का?

रात्रीच्यावेळी ब्रा घालून  झोपण्यात काही अडचण नाही. रात्री ब्रा घालून झोपल्याने शारीरिक समस्या उद्भवतात, असा कोणताही रिसर्च समोर आलेला नाही. रात्री ब्रा घालून झोपल्याने किंवा ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो किंवा इतर स्तनांचे आजार होतात असं अजिबात नाही.  तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार रात्री ब्रा घालून किंवा काढून झोपू शकता.

हेवी ब्रेस्ट असलेल्या महिला आपल्या कंम्फर्टसाठी रात्री ब्रा घालू शकतात. ब्रा घातल्यामुळे  बॉडी पोश्चर आणि बॉडी इमेज योग्य राहते. आपल्या शरीराबाबत  कॉन्फिडंस येतो.  चांगल्या फिटींगची ब्रा घातल्याने ओव्हरलऑल पर्सनॅलिटीवर चांगला परिणाम होतो. कोणत्याही ड्रेसची फिटींग व्यवस्थित बसते. 

ऑफिसमध्ये तासनतास बसून पोट सुटलंय? जागेवरच उभं राहून ३ व्यायाम करा, मेंटेन होईल फिगर

ब्रा कोणी घालू नये

जर तुम्हाला छाती जवळ इन्फेक्शन, खाज, सूज असेल तर शक्यतो रात्रीच्यावेळी घालणं  ब्रा  टाळा. हे त्रास कमी झाल्यानंतर पुन्हा नियमित ब्रा घालू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांत कॉटन ब्रा घालू शकता. ही अतिशय कम्फर्टेबल असते. यात त्वचेला श्वास घ्यायला जागा मिळते. 

योग्य ब्रा कशी निवडवावी?

ब्रा विकत घेताना कंम्फर्टचा विचार करणं गरजेचं आहे.  ब्रा जास्त घट्ट असू नये जास्त लूजही असू नये. काही महिला रात्रीच्या वेळी एकदम लूज ब्रा घालून झोपतात जे योग्य नाही. यामुळे ब्रेस्टला कोणत्याही प्रकारे सपोर्ट मिळत नाही. जर तुम्हाला पॅडेड ब्रा आरामदायक वाटत असेल तर ती घाला. फिटींग आणि कम्फर्टचा विचार करा.

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

असा कोणताही रिसर्च समोर आलेला नाही की ब्रा न घातल्याने ब्रेस्टचे आजार होतात. वयानुसार त्वचा, शरीराच्या इतर भागांमध्ये बदर होतात त्याचप्रमाणे ब्रेस्टसुद्धा लूज होत जाते. म्हणून स्तनांना सपोर्ट देण्यासाठी ब्रा वापरणं गरजेचं आहे. कायम  ब्रा न घातल्याने स्तन ओघळणं, आकारा बेढब दिसणं अशी स्थिती उद्भवते.

टॅग्स : हेल्थ टिप्समहिलास्त्रियांचे आरोग्य