Join us   

थायरॉईडमुळे वजन वाढत चाललंय? प्या मसूर डाळीचे पौष्टिक सूप, बघा वजनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2023 12:44 PM

Weight gain due to thyroid? Drink nutritious lentil soup, see weight loss मसूर डाळ हा अत्यंत पौष्टिक पर्याय उपलब्ध आहे, वजनाचे टेन्शन कमी

थायरॉईड हे गळ्याच्या पुढील भागात असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. ह्या ग्रंथीचे कार्य शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणे असते. ही ग्रंथी अन्नाचे रूपांतरण ऊर्जेत करते. यासोबतच श्वास, हृदय, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे कार्यही करते. पण जेव्हा ही ग्रंथी पुरेशी हार्मोन्स तयार करू शकत नाही, तेव्हा त्याला हायपोथायरॉईडीझम म्हणतात.

हायपोथायरॉईडीझममध्ये वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. यासह थकवा, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, सुजलेला चेहरा, कोरडे केस, कर्कश आवाज इत्यादींचा समावेश आहे. डायटीशियन मनप्रीत यांच्या मते, हायपोथायरॉईडला मॅनेज करण्यासाठी ५ मायक्रोन्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. जे फक्त एकाच रेसिपीमधून मिळेल. ही रेसिपी एक सूप असून, याचे फायदे अनेक आहेत''(Thyroid weight loss diet : Drink nutritious lentil soup).

हायपो थायरॉईडसाठी फायदेशीर रेसिपी - मसूर डाळ सूप

हेल्दी सुपसाठी लागणारं साहित्य

तूप 

गाजर 

लाल मसूर 

मीठ 

मिरपूड 

पाणी 

भोपळ्याचे काप 

सूर्यफुलाच्या बिया 

या पद्धतीने बनवा मसूर डाळ सूप

सर्वप्रथम गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवा, त्यात तूप घालून गरम करा, आता त्यात १ चिरलेला गाजर भाजून घ्या. त्यानंतर त्यात २  चमचे लाल मसूर, चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण मिक्स करा. नंतर थोडे पाणी घालून उकळवा आणि झाकण ठेवून १० मिनिटे शिजवा. सूप तयार झाल्यानंतर एका वाटीत काढा, त्यात भोपळ्याचे काप आणि सूर्यफुलाच्या बिया टाकून डिश सर्व्ह करा.

तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

मसूर डाळ सुपमधून मिळतील ५ महत्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट्स

डब्ल्यूएचओच्या मते, मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये असे काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जी शरीराला अगदी कमी प्रमाणात आवश्यक असतात. हे पोषक तत्व थायरॉईड संप्रेरक पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. आहारतज्ञांच्या मते, या सूपमध्ये व्हिटॅमिन ए, आयोडीन, लोह, जस्त आणि सेलेनियम आढळते. जे हायपोथायरॉईडसाठी फायदेशीर आहेत.

व्हिटॅमिन ए, आयोडीन आणि लोह

व्हिटॅमिन ए, आयोडीन आणि लोह हे असे तीन पोषक घटक आहेत, ज्यांच्या कमतरतेमुळे थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन कमी होते. हायपोथायरॉईडीझममध्ये या मायक्रोन्युट्रिएंट्सचे सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर असल्याचे, अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे.

३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

झिंक आणि सेलेनियम

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये सेलेनियम असते. हे दोन्ही घटक थायरॉईड ग्रंथी सक्रिय करण्यात मदत करतात. यासह हार्मोन्सचे उत्पादन वाढवून वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य