Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Weight Lose Tips : नाश्त्याला 'या' ६ चुका केल्यानं भरभर वाढतं वजन; मेंटेन राहण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Weight Lose Tips : नाश्त्याला 'या' ६ चुका केल्यानं भरभर वाढतं वजन; मेंटेन राहण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Weight Lose Tips : अनेकवेळा सकाळी घाईघाईत नाश्ता कमी केला जातो. ही अशी चूक आहे, ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा झपाट्याने वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 11:40 AM2021-12-19T11:40:25+5:302021-12-19T12:07:34+5:30

Weight Lose Tips : अनेकवेळा सकाळी घाईघाईत नाश्ता कमी केला जातो. ही अशी चूक आहे, ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा झपाट्याने वाढतो.

Weight Lose Tips : Weight loss 6 mistakes you are making at breakfast that's sabotaging your goals | Weight Lose Tips : नाश्त्याला 'या' ६ चुका केल्यानं भरभर वाढतं वजन; मेंटेन राहण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Weight Lose Tips : नाश्त्याला 'या' ६ चुका केल्यानं भरभर वाढतं वजन; मेंटेन राहण्यासाठी वेळीच जाणून घ्या

वजन कमी करणं सध्याच्या काळातील एक मोठी समस्या बनलंय. दिवसभर धावपळ करूनही अनेकांचं वजन कमी होत नाही तर हालचालीच्या अभावानं शरीराचे दंड, मांड्या, पोट या भागांवरची चरबी वाढते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तज्ज्ञ बहुतेकदा सकाळचे पहिले जेवण म्हणजे नाश्ता घेण्यावर अधिक भर देतात. बहुतेक आहार तज्ज्ञ देखील सहमत आहेत की आपण कोणत्याही परिस्थितीत नाश्ता वगळू नये. (How to lose weight faster)

नाश्ता केल्यानंतर काही तासांतच जर तुम्हाला भूक लागत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या मेनूकडे लक्ष दिले पाहिजे. सन डॉट कॉमच्या अहवालात असे म्हटले आहे की, नाश्ता केल्यानंतर काही वेळाने तुम्हाला पुन्हा भूक लागली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही नाश्ता करताना काही चूका करत आहात. 

नाश्त्याला साखर खाणं

न्याहारी करूनही तुमची भूक भागत नसेल, तर सर्वात आधी पाहा की, वेळ वाचवण्यासाठी तुम्ही शॉर्टकट म्हणजे पॅक केलेले  पदार्थ खात नाही ना. किंवा कदाचित तुम्ही पॅक केलेला संत्र्याचा रस पीत असाल.  कोणत्याही ब्रँडच्या पॅकेज केलेल्या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे जास्त कॅलरीज वापरणे टाळण्यासाठी, 100 टक्के फळांचा रस लिहिलेले ज्यूस खरेदी करा.

कॅलरीज खाणं

सर्व प्रथम रिक्त कॅलरी म्हणजे काय ते समजून घ्या. सर्व पदार्थांमध्ये कॅलरीज असतात. कॅलरीज एकतर शरीर ऊर्जा म्हणून वापरतात किंवा चरबीमध्ये बदलतात. तुम्ही एका वेळी किती कॅलरीज खात आहात यावर ते अवलंबून आहे. ह्यूस्टन मेथोडिस्ट (यूएसए) येथील क्लिनिकल आहार तज्ञ लेस्ली रामिरेझ स्पष्ट करतात की जर अन्नामध्ये पोषक तत्वे नसतील किंवा साखर आणि कॅलरीजचे प्रमाण अन्नामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांपेक्षा जास्त असेल तर त्याला रिक्त कॅलरीज म्हणतात. लिंबूपाणी, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल, जंक फूड, फास्ट फूड, कँडी, केक, डोनट्स ही रिकाम्या कॅलरीजची उदाहरणे आहेत.

वजन झरझर कमी करण्यासाठी गुणकारी ठरतो 'या' ५ प्रकारचा चहा; प्याल तर नेहेमी मेंटेन राहाल

कॅलरीजयुक्त पदार्थाचं सेवन

तुम्ही नाश्त्यात कॅलरीयुक्त पदार्थही खात असल्यास, काळजी घ्या. सन डॉट कॉमच्या मते, थोड्या प्रमाणात चरबी ठीक आहे, परंतु तळलेले पदार्थ संतृप्त चरबी आणि कॅलरींनी भरलेले असतात ज्यामुळे तुम्हाला आळस येतो.

प्रोटीन्स न घेणं

ज्या लोकांच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते त्यांचे वजन वाढते. प्रथिने केवळ स्नायू तयार करण्यास मदत करत नाहीत तर भूक नियंत्रित करण्यासाठी देखील चांगले आहेत. प्रथिनांसाठी सोयाबीन, दही, चणे, पनीर, बीन्स आणि कमी चरबीयुक्त दूध यासारखे पर्याय निवडू शकता. तज्ज्ञांच्या मते, हेल्दी ब्रेकफास्टमध्ये प्रथिने, फॅट आणि कार्बोहायड्रेट्स या सर्व गोष्टींचा समावेश असावा. 

घाईघाईत नाष्ता करणं

अनेकवेळा सकाळी घाईघाईत नाश्ता कमी केला जातो. ही अशी चूक आहे, ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. त्याऐवजी, जर तुम्ही हळू हळू नाश्ता केला आणि चघळला तर तुम्हाला कमी भूक लागेल आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल. डेस्कवर बसून नाश्ता करण्यासारख्या युक्त्या टाळा. फक्त दहा मिनिटे शांतपणे आणि मन लावून खा.

 वजन झटपट कमी करायचंय? संध्याकाळी ५ नंतर टाळा फक्त 'या' चुका, नेहमी दिसाल मेंटेन

जास्त भूक लागत नाही तोपर्यंत न खाणं

खूप लोक भूक लागेपर्यंत जेवत नाहीत. पण ही चूक तुमचे वजन कमी करण्यात अडथळे निर्माण करत आहे. न्याहारीची वेळ ठरवणे चांगले. अधूनमधून उपवास करणे चांगले. हे तुम्हाला इंसुलिन आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करेल. जेव्हा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचे आपले सर्व प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हा आपण खूप लवकर निराश होतो. तज्ज्ञांच्या मते, नाश्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करा. दही, गडद हिरव्या भाज्या, ओट्स, ऑम्लेट हे नाश्त्याचे उत्तम पर्याय आहेत.

Web Title: Weight Lose Tips : Weight loss 6 mistakes you are making at breakfast that's sabotaging your goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.