भाज्या खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. भाज्यांमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटामीन्स आणि फायबर्स असतात. ज्यातून शरीराला पोषक तत्व मिळतात. ही सगळ्यात पॉवरफुल भाज्यांपैकी एक आहे. (Health Tips) कारली, पालक, ब्रोकोली या भाज्यांचा तुम्ही आहारात समावेश करत असालच पण जांभळ्या रंगाची ही भाजी आरोग्यासाठी वरदान ठरते. (Amazing Health Benefits Of Purple Cabbage)
हिरव्या रंगाची पत्ता कोबी तुम्ही खातच असाल पण जांभळ्या रंगाची कोबी व्हिटामीन, मिनरल्स, एंटीऑक्सिडेंट्सचा खजिना आहे. ( Health Benefits Of Purple Cabbage) याचे नियमित सेवन केल्यानं वजन कमी करण्यास मदत होते आणि हाडं मजबूत होता. इम्यूनिटी चांगली राहण्यासही मदत होते. पचनक्रिया चांगली राहते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार भाज्या आपल्या आहाराचा एक भाग आहेत.(ref)
जांभळ्या पत्ताकोबीतील पोषक तत्व
या पत्ता कोबीत २८ कॅलरीज असतात, १० ग्राम प्रोटीन असते, प्रोटीन असते, ७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, २ ग्राम फायबर्स असते. ५६ टक्के व्हिटामीन सी असते, कॅल्शियम ४ टक्के असते, आयर्न ३ टक्के असते, पोटॅशियम ५ टक्के असते. या प्रकारच्या कोबीत एंथोसायनिन यांसारखे एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे हानीकारक फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. यातील गुण ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेसपासून बचाव करतात.
कॅन्सरचा धोका कमी होतो. यातील एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण शरीरातील सूज कमी करतात आणि अस्थमासारखे आजार उद्भवत नाहीत. यात फ्लेवोनोइड्स आणि पॉलिफेनोल्स असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. रक्तभिसारण चांगले होते. हृदय निरोगी रागते आणि हृदयाच्या आजारांचा धोका टाळण्यास मदत होते.
इम्यूनिटी बुस्टर आणि पचनक्रिया वाढवण्यास मदत होते.
पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी
यात व्हिटामीन सी चे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे एंटी बॉडीजचे उत्पादन वाढून इम्यून सिस्टीम चांगली राहते. ज्यामुळे शरीरातील संक्रमण आणि आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. हा फायबर्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. नियमित ही भाजी खाल्ल्याने मल त्याग करण्यास मदत होते. फायबर्सयुक्त डायवर्टिक्युलिटिस आणि कोलोरेक्टल कॅन्सरसारख्या पचन विकारांपसून बचाव करण्यास मदत होते.
या भाजीत कॅलरीज आणि फॅट्स कमी असतात. फायबर्स जास्त असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यातील फायबर्स शरीराला निरोगी ठेवतात. भूक आणि कॅलरीजचे सेवन शरीराला मदत करते. ही भाजी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी तत्व शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवतात. या कोबीच्या सेवनाने ऑस्टिओपोरोसिस रोखून हाडांचे घनत्व सुधारण्यास मदत होते. यामुळे कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखता येतो. कोलन कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर आणि फुफ्फुसांचे विकार रोखण्यासही मदत होते.