Join us   

पोट सुटले, मागून कंबरेवर टायर्स? चिमुटभर हळदीची जादू, फॅटलॉस होईल झटपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:08 AM

Weight Loss How To Using Turmeric : फॅट लॉस करून सुडौल शरीर मिळवण्यासाठी तुम्हाला किचनमध्ये ठेवलेल्या काही पदार्थांचा वापर करावा लागेल.

वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. (Weight Loss Tips) पण थंडीच्या दिवसांत वजन कमी करणं खूपच कठीण असतं. (Weight Loss How To Using Turmeric) सतत बसून पोट सुटतंच पण पोटाबरोबरच मांड्या, कंबरही जाड दिसायला लागतं. कंबरेचा आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी जिमला जाऊन  तासनतास व्यायम करणं अनेकांना जमत नाही. (Tips To Help You Lose Weight)

फॅट लॉस करून  सुडौल शरीर मिळवण्यासाठी तुम्हाला किचनमध्ये ठेवलेल्या काही पदार्थांचा वापर करावा लागेल. (Curcumin & Weight Loss) हळद हा एक मसालायुक्त पदार्थ आहे, ज्याची चव आणि रंगामुळे स्वंयपाकात बरेच फायदे मिळतात. वजन कमी करण्यासाठी हळद कशी वापरावी ते पाहूया. (Effects of Turmeric on Weight Loss)

अलिकडेच समोर आलेल्या संशोधनानुसार हळद वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. प्राण्यांवर केलेल्या अभ्यासात दिसून आले की, हळदीतील करक्यूमिन हे कंम्पाऊंड चरबी वाढवणारे घटक नियंत्रणात ठेवतात. (Ref) वजन कमी करू न शकलेल्या ४४ लोकांवर केलल्या अभ्यासात दिसून आलं की, दिवसातून दोनवेळा ८०० मिलीग्रॅम करक्यूमिन घेतल्यामुळे शरीराचा बी.एम.आय (बॉडी  मास इंडेक्स) कमी झाला होता. (Ref) याशिवाय कंबर आणि नितंबाची चरबीही कमी झाली होती.

पोट सुटलंय-खाण्यावर कंट्रोलही नाही? घ्या साधा-सोपा डाएट प्लॅन; १५ दिवसांत वजन होईल कमी

कच्च्या हळदीतील पोषक गुण (Turmeric Properties)

कच्च्या हळदीत एंटीबॅक्टेरिअल, एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी फंगल तत्व असतात. त्यात व्हिटामीन सी, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, जिंक, थियामिन, रायबोफ्लोविन असते.  या पोषक तत्वांमुळे शरीराचा शारीरिक समस्यांपासून बचाव होतो.   

वजन कमी करण्यासाठी हळदीचं पाणी कसं तयार करायचे? (How to Make Turmeric Water)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही कच्च्या हळदीच्या पाण्याचे सेवन करू शकता. रिकाम्या पोटी ओल्या हळदीचे सेवन केल्यानं वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल. ओल्या हळदीचे पाणी २ ग्लास पाण्यात घालून प्यायल्याने शरीराला बरचे फायदे मिळतील. पाण्यात कच्ची हळद घाला आणि पाण्यात व्यवस्थित मिसळा.

कितीही खा वजन वाढतच नाही? प्रोटीन पावडरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे हे 'घरगुती चुर्ण'; एका आठवड्यात दिसेल फरक

हळदीचे तुकडे आणि 2 ग्लास पाणी उकळायला ठेवा. जेव्हा एक ग्लास पाणी उरेल तेव्हा गॅस बंद करा आणि पाणी एका ग्लासात गाळून घ्या. या कोमट पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ओल्या हळदीचे पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही  हळजीचे दूध किंवा भाजीत जास्त प्रमाणात हळद घालून याचे सेवन करू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य