Join us   

वजन कमी होईल म्हणून साखरेऐवजी गुळ खाता? तज्ज्ञ सांगतात वाढेल झपाट्याने वजन आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 2:30 PM

Weight loss: Should you replace sugar with jaggery to lose weight : साखरेऐवजी गुळ खाल्ल्याने खरंच वजन वाढते की कमी होते? नक्की खरं काय?

वजन कमी करण्याच्या नादात आपण अनेक गोष्ट स्किप करतो. काही लोकं चपाती खाणं बंद करतात. तर काही भात खाणं टाळतात. बाकी बहुतांश लोकं साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य देतात. गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन-सी असते (Jaggery). गुळ खाल्ल्याने आरोग्यालाच फायदा मिळतो असे नाही, यामुळे स्किन आणि केसांचे अनेक समस्या सुटतात (Weight Loss Tips).

हेल्दी म्हणून आपण साखरेऐवजी गुळ खातो, पण यामुळे वजन वाढते की कमी होते असा प्रश्न निर्माण होतो(Weight loss: Should you replace sugar with jaggery to lose weight).

यासंदर्भात, न्युट्रिशन क्लिनिकचे डायटीशियन डॉक्टर सुगीता मुटरेजा सांगतात, 'गुळात ग्लुकोज आणि फ्रक्टोज असते जे वजन वाढण्यास मदत करते. पण जर आपण वजन कमी करण्यासाठी साखरेऐवजी गुळ खात असाल तर, टाळा. गुळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते.'

जेवलं की आंबट ढेकर येतात? गॅसेसचा त्रास? आयुर्वेदाचार्य सांगतात-जेवल्यानंतर करा फक्त एक काम

मसिना हॉस्पिटलस्थित मुंबईच्या क्लिनिकल डायटीशियन अनम गोलंदाजी सांगतात, 'साखरेपेक्षा गुळ जास्त पौष्टीक असते. १०० ग्रॅम गुळात अंदाजे ३८५ ग्रॅम कॅलरीज असतात. पण ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी जास्त प्रमाणात गुळ खाऊ नये.'

वजन वाढवण्यासाठी गुळासोबत काय खावे?

गुळ आणि तूप

वजन वाढवण्यासाठी आपण गुळासोबत तूप खाऊ शकता. याचा फायदा आरोग्याला देखील होतो. जर आपले काही केल्या वजन वाढत नसेल तर, गुळ वितळून त्यात तूप मिक्स करून खा.

गुळ आणि शेंगदाणे

गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. आपण नियमित मुठभर शेंगदाणे आणि गुळ खाऊ शकता.

गुळाचा चहा

काही लोकं साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पितात. याचा दुष्परिणाम आरोग्याला होत नाही. यातील गुणधर्मामुळे हाडं मजबूत होतात. त्यामुळे साखरेऐवजी गुळाचा चहा पिऊ शकता.

कानात मळ झाला आहे? पिन-इअरबड्स घालू नका, पाहा ३ उपाय- बहिरेपणाचा धोका टाळा

गुळ कधी आणि कोणी खाऊ नये?

- अधिक प्रमाणात गुळ खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे आपण वजन कमी होईल या हेतूने साखरेऐवजी गुळ खात असाल तर, मर्यादित प्रमाणात खा. ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांनी अधिक प्रमाणात गुळ खावे.

- गुळामध्ये साखर आणि सुक्रोज अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

- गुळ हा उष्ण पदार्थ आहे. त्वचेवर पुरळ किंवा ॲसिडिटीची समस्या असल्यास गुळाचे सेवन करू नये. 

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य