Join us   

वजन कमी करायचं म्हणून तातडीने चहा ‘बंदच’ करायला हवा का? चहाला पर्याय काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 5:31 PM

Weight loss: This is how you should drink your tea for weight loss वजन कमी करायचं, पित्त कमी करायचं तर आधी चहा बंद करण्याचा सल्ला दिला जातो, तो कितपत कामाचा?

बहुतांश लोकं वजन कमी करत असताना डाएटमधून चहा वगळतात. चहा प्यायल्याने वजन वाढते असे काहींचे म्हणणे आहे. परंतु, चहा प्यायल्याने खरंच वजन वाढते का? का आपण चुकीच्या वेळेस चहा पितो म्हणून वजन वाढते? पण जर तुम्हाला कोणी म्हणालं की, नियमित चहा प्या, वजन वाढणार नाही तर?.. विश्वास बसेल? चहा पिऊन वजन वाढणार नाही! शक्यचं नाही. असं तुम्ही म्हणाल.

यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी चहा पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कसे वजन वाढते, व नियमित चहा प्यायल्याने कसे वजन वाढणार नाही, याची माहिती दिली आहे(Weight loss: This is how you should drink your tea for weight loss).

नियमित चहा प्यायल्याने वजन वाढते?

चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे चहा प्यायल्याने वजन झपाट्याने वाढते, तर असे नाही. परंतु, चहामध्ये जोडलेले घटक वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात. चहातील कोणत्या घटकांमुळे वजन वाढते हे पाहूयात.

१ चमचा मध खाण्याचे ५ फायदे, वजन कमी होण्यापासून मेंदू तेज होण्यापर्यंत गुणकारी मध

फुल क्रीम दूध

चहामध्ये फुल क्रीम दूध घातल्याने त्याच्या कॅलरीज वाढतात. दुधामध्ये फॅट असते आणि ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. लिमा महाजन सांगतात, ''दुधाच्या फॅट्स टक्केवारीनुसार एका कप चहामध्ये ३३-६६ कॅलरीज असतात. चहाच्या कॅलरीज कमी करण्यासाठी आपण फुल क्रीम ऐवजी स्किम्ड मिल्क वापरू शकता.

याशिवाय त्यात मिसळलेली साखर हे देखील वजन वाढण्याचे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करा. याशिवाय चहासोबत बिस्किटे किंवा नमकीनसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर, ते खाणे टाळा. वजन वाढणार नाही.''

वजन कमी करण्यासाठी चहा कसा प्यावा?

वजन कमी करण्याच्या बाबतीत, संयम राखणे गरजेचं आहे. कारण खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर ताबा ठेवणे आवश्यक आहे. अधिक प्रमाणात चहा प्यायल्याने शरीरात जास्त प्रमाणात कॅफीन यासह अनहेल्दी कंपाउंड्स आढळतात. ज्याचा थेट दुष्परिणाम आरोग्यावर होतो. याबाबतीत न्यूट्रिशनिस्ट सांगतात, ''दिवसातून फक्त २ कप चहा प्या, त्यापेक्षा जास्त चहा पिऊ नका. जेणेकरून आपली चहा पिण्याची तलब मिटेल. यासह वजन देखील नियंत्रणात राहील.''

अल्कलाइन पाणी प्या, ॲसिडिटीसह-वजन होईल कमी! -आध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकर यांचा विशेष सल्ला

चहा आणि जेवणाच्या वेळेत अंतर ठेवा

जेवणाच्या आधी किंवा नंतर, चहा पिणे टाळा, कारण यामुळे पचनक्रिया आणि पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होऊ शकते. जेवण केल्यानंतर किमान ३० मिनिटानंतर चहा प्यावा. कारण यामुळे अन्नातील पोषक घटक प्रभावीपणे शोषून घेण्यास वेळ मिळतो. व अन्न देखील बऱ्यापैकी पचते.

झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा

झोपण्यापूर्वी चहा प्यायल्याने झोपेचा पॅटर्न व पचन दोन्ही बिघडू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. कारण झोपेत शरीरातील हार्मोन्स उत्तमरित्या काम करतात, जे आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. झोप घेण्याच्या काही तास आधी चहा पिणे टाळा.

टॅग्स : हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्य