Join us   

पोट खूप सुटलं? एक सोपा आयुर्वेदिक उपाय करा, चरबी होईल भरभर कमी आणि तब्येतही सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:46 AM

Weight Loss Tips : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते मधात अनेक औषधी गुण असतात. ज्यामुळे डोळे चांगले राहण्यास मदत होते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही जिमला जाण्यापासून वेगवेगळे डाएट करून थकला असाल आणि काहीच उपयोग होत नसेल तर तुम्ही आयुर्वेदीक उपाय करू शकता. आयुर्वेदात मधाचा वापर शरीराच्या समस्यांसाठी उत्तम मानला गेला आहे. वजन कमी करण्यासाठी हा सगळ्यात सरळ आणि असरदार उपाय आहे. (According To Ayurveda Charak Samhita Drink Honey Water To Melt Belly Fat) आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते मधात अनेक औषधी गुण असतात. ज्यामुळे डोळे चांगले राहण्यास मदत होते. मध तहान भागवण्याचेही काम करते. कफ दोष कमी होतो, मुत्र मार्ग विकार, दमा,  खोकला, जुलाब, उलट्या यांसारख्या समस्यांवरही मध उत्तम उपाय आहे.

मधाचे फायदे (Honey Eating Benefits) 

मध एक नॅच्युरल डिटॉक्सिफायर आहे ज्यामुळे शरीर नैसर्गिक स्वरूपात साफ होण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी हे उत्तम ठरते. ज्यामुळे त्वचा चांगली राहते. मधाच्या सेवनाने गंभीर जखम ठीक होण्यासही मदत होते. मधाच्या पोळ्यातून काढलेलं ताजं मध शरीराचे वजन वाढवते.  ज्यामुळे मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते आणि कफ दोष कमी होतो.  

आयुर्वेद मधाच्या खास गुणधर्मांवर प्रकाश टाकते. मधाला योगवाही असंही म्हटलं जातं. योगवाही म्हणजे जे पदार्थ शरीरात सर्वात गहन ऊतकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ठेवतात.  मधाचा उपयोग अन्य हर्बल उपायांप्रमाणेच केला जातो. ज्यामुळे यातील औषधी गुण वाढतात.

 

आयुर्वेद मानतो की मधाचा सुयोग्य वापर शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा मध मिसळून याचे सेवन करा. मात्र अतीगरम पदार्थांत मध घालू नये किंवा मध गरम करुन खाऊ नये.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलफिटनेस टिप्स