आजच्या काळात आपण फिट हेल्दी राहावं असं प्रत्येकाला वाटतं. (Weight Loss Tips) जेव्हापासून फिटनेसचा ट्रेंड वाढला आहे जेव्हापासून लोकांमध्ये जीम आणि वर्कआऊटची आवडही वाढली आहे. आपण जीमला जाऊन स्लिम फिट व्हावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यासाठी डाएट, वर्कआऊट या दोन्ही गोष्टी असणं फार महत्वाचे असते. (Health Tips) बॉडी फॅट कमी करण्याच्या पद्धतीवर आहारतज्ज्ञांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक्सपर्ट्सनी काही डाएट टिप्स शेअर केल्या आहेत. (Dietary Tips To Lose Body Fat Expert Tells Home Remedies)
बॉडी फॅट कमी करण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी कराव्यात
1) दालचिनीचीचा चहा
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार दालचिनी बॉडी वेट आणि बीएमआय कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. दालचिनी फॅट कमी करण्यासाठी बरीच फायदेशीर ठरते. सकाळी उठून दालचिनीच्या पाण्याचे सेवन करू शकता (Ref). याचे अधिकाधिक फायदे मिळण्यासाठी दुपारच्या जेवणाच्या ३० मिनिटं आधी याचे सेवन करा. ज्यामुळे क्रेव्हिंग्स कंट्रोल होतात आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे भूक लागत नाही आणि लवकर वजन कमी होतं.
2) मेथी दाण्यांचे पाणी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीच्या दाण्यांचे सेवन करू शकता ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते आणि वजनही कमी होते. यामुळे तुम्ही भूक कंट्रोल करू शकता कॅलरी इंटेक कमी होते आणि हळूहळू बॉडी फॅटही कमी होऊ लागते.
मुलांचा मेंदू तल्लख होईल-स्मरणशक्ती वाढेल; रोज ५ पदार्थ खायला द्या, शार्प माईंड होईल
3) कॅमोमाईल टी
मेंदू आणि शरीर रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही कॅमोमाईल टी चे सेवन करू शकता. रात्री झोपण्याआधी हा चहा प्यायल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. याचे अधिकाधिक फायदे मिळवण्यासाठी ३० मिनिटं आधी कॅमोमाईट चहामध्ये जायफळ घालून याचे सेवन करा ज्यामुळे चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होईल याच्या सेवनाने मेटाबॉलिझ्म वाढतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
4) कढीपत्ता
लठ्ठपणा कमी करण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्यापोटी २ ते ३ कढीपत्ते चावून खा. त्यामुळे शरीर डिटॉक्स होईल आणि मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होईल. पचनक्रिया सुधारेल. तुम्ही स्वंयपाकात कोणत्याही भाजीत याचा वापर करू शकता.
१ महिन्यात ४ किलो वजन कमी करा-आहारतज्ज्ञांनी सांगितलं खास डाएट; मेंटेन राहण्याचं साधं सिक्रेट
5) चिया सिड्स
चिया सिड्स आणि सब्जा दोन्ही पदार्थ फायदेशीर ठरतात. या बारीक बिया असतात ज्या पाण्यात भिजवल्यामुळे जेलप्रमाणे होतात. चिया सिड्स तुम्ही कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता. यात ओमेगा-३ असते ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होते आणि वजनही कमी होते. जर तुम्ही कोणत्याही आजारावरील औषधं घेत असाल तर हे उपाय करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.