Join us   

शरीर बारीक पण पोट सुटलंय? रात्रीच्या जेवणात ५ पदार्थ खा, तब्येत राहील मेंटेन-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 3:03 PM

Healthy dinner ideas for weight loss : रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाल्ल्यानं वजन कमी करण्यास मदत होते समजून घेऊया. (Healthy dinner ideas for weight loss)

वाढत्या वयात लोकांना ओव्हरवेट असण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक जीम, व्यायाम यांसारखे अनेक उपाय करतात. (Weight Loss Tips) जीवनशैलीत  काही बदल करून तुम्ही वाढलेलं वजन कमी करू शकता. (Desi Recipes To Try For Weight Loss Diet) पोट कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात काय आणि किती अन्न खाता हे सुद्धा महत्वाचं असतं. रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाल्ल्यानं वजन कमी करण्यास मदत होते समजून घेऊया. (Healthy dinner ideas for weight loss)

मेथी ओव्याचा पराठा

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक पराठे खाणं टाळतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओवा आणि मेथी घातलेले कमी तेलाचे पराठे रात्रीच्या जेवणासाठी खाऊ शकता. यात फायबर्स असतात. ज्यामुळे झटपट वजन कमी करण्यास मदत होते. 

कोकोनट राईस

नारळाचे तांदूळ म्हणजेच कोकोनट राईस अशी ही रेसिपी आहे ज्यामुळे पोट भरतं आणि चवीलाही उत्तम असते. कोकोनट राईस साऊथ इंडियन  पदार्थांपैकी एक आहे. आठवड्यातून १ ते २ वेळा  हा भात घरीच बनवून तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी खाऊ शकता.

मुगाच्या डाळीची खिचडी

तुम्ही कितीही बाहेरचे पदार्थ खाल्ले तरी घरातल्या  जेवणाची मजाच काही वेगळी असते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी मूग डाळ खिचडीचे सेवन करायला हवे. मूग डाळ खिचडीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स  आणि कार्बोहायड्रेट्स असतात.  ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.  यातून डाळ आणि तांदळातील पोषक तत्व तुमच्या शरीराला मिळतात.

तंदूरी पनीर

वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात तंदूरी पनीरचा समावेश करू शकता. पनीर हा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. पनीर लो फॅट असते. पनीर खाल्ल्यानं शरीर निरोगी आणि तंदरूस्त राहते.

आळशीचा रायता

आळशीचा रायता भाजी चपातीबरोबर खाल्ला जाणारा पदार्थ आहे. आळशीच्या बीयांपासून बनवलेला हा पदार्थ खाल्ल्यानं कमी खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटतं.  यामुळे तुमचा फूड इन्टेक कमी होतो आणि रात्री मध्येच उठून काहीही खाण्याची इच्छा होत नाही.

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स