Join us   

कंबर-पोट सुटलंय, शरीर बेढब दिसतं? जीरं-ओवा अन् मेथीचा ३ इन १ फॉर्म्युला; झरझर घटेल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:19 PM

Weight Loss Tips :  वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही साधे-सोपे उपाय करू शकता.

वजन वाढण्याचा प्रोब्लेम सध्याच्या स्थितीत खूपच कॉमन आहे. (Health Tips) एकदा वजन वाढलं की कमी होता होत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या डाएट थेरेपीज करतात. (Weight Loss Tips) तरीही देखिल याचा चांगला परिणाम दिसून येत नाही. (How To Loss Quickly) वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही साधे-सोपे उपाय करू शकता. स्वंयपाकघरातील काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही वाढलेलं वजन कमी करू शकता. (How To Loss Weight By Using 3 Kitchen Ingredients)

रिसर्चनुसार मेथीच्या बीयांमध्ये एंटी कोलेस्टेरॉलयुक्त आणि एंटी ओबेसिटीयुक्त गुणधर्म असतात. मेथीच्या पाण्याचे रोज सकाळी सेवन केल्यास गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते (Ref). मेथीच्या पाण्याच्या सेवनाने मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते. मेथीबरोबरच ओवा, जीरं, दालचिनी या पदार्थांचे सेवन केल्याने  वजनावर चांगला परिणाम होतो. वाढललेलं वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. 

या ड्रिंकमुळे ब्लॉटींग, गॅसेसचा त्रास कमी होईल. त्याचबरोबर ब्लड शुगर मॅनेज होण्यास मदत होईल याशिवाय मेटाबॉलिझ्म वाढतं, ब्लड कोलेस्टेरॉल लेव्हल मॅनेज होण्यास मदत होते. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल तरीही तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही हे ड्रिंक घेतलं तरी तुम्हाला व्यायाम करावा लागेल. हा व्यायाम करणं अगदी सोपं आहे.

प्रोटीन हवंय बदाम परवडत नाही? 'या' ५ डाळी खा, साइड इफेक्ट्सही होणार नाहीत

वजन कमी करण्यासाठी  ड्रिंक बनण्यासाठी लागणारं साहित्य (How To Make Weight Loss drink)

1) मेथीचे दाणे- १ चमचा

२) जीरं- १ चमचा

३) ओवा- अर्धा चमचा

४) पाणी -१ कप

सगळ्यात आधी काय करावे लागते? (What To Do For Weight Loss)

सगळ्यात एका भांड्यात पाणी उकळवून घ्या. उकळ्यात पाण्यात मेथीचे दाणे, जीरं आणि ओवा घाला. ५ मिनिटं व्यवस्थित उकळू द्या, गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या, थंड झाल्यावर या पाण्याचे सेवन करा. तुम्हाला हे तिन्ही पदार्थ एकत्र घ्यायचे नसतील तर तुम्ही  या 3 पैकी कोणताही एक पदार्थ गरम पाण्यात उकळवून  गाळून या पाण्याचे सेवन करू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलवेट लॉस टिप्स