लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा व खास क्षण असतो. साहजिकच आपल्याला तो क्षण मोठ्या उत्साहात साजरा करायचा असतो. इतरांपेक्षा आपला लग्न सोहळा कसा वेगळा होईल यासाठी खूप प्लॅनिंग केलं जात. लग्नात नवरा, नवरी यांचा वेगळाच थाट असतो. त्या दिवशी आपण खूप छान दिसावं ही प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मग त्यासाठी लग्नाच्या २ ते ३ महिने आधी खरेदी, पार्लर, सेल्फ ग्रूमिंग, जिम अश्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते.
लग्नाच्या दिवशी आपण आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येक नवरी तयारी करत असते. परंत्तू काही वेळा न संपणारी खरेदी, धावपळ, दगदग यामुळे पूर्ण थकून जातो. लग्नाच्या दिवशी फक्त महागडे कपडे आणि मेकअप करून सुंदर दिसण्यापेक्षा प्री - वेडिंग हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करून जर तुम्ही सुंदर दिसलात तर कोणाला नाही आवडणार ? लग्नाच्या आधी जस प्री - वेडिंग फोटोशूट केलं जात तसच खास नववधूसाठी प्री - वेडिंग डाएट प्लॅन बद्दल जाणून घेऊयात... (Pre-Wedding Diet Plan for Every Bride-to-Be).
नववधूसाठी हा आहे प्री - वेडिंग हेल्दी डाएट प्लॅन...
१. हायड्रेशन - जे लोक स्वतःला हायड्रेटेड ठेवत नाहीत त्यांना नेहमी थकल्यासारखे व कमजोर वाटते. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुमच्या घामावाटे शरीरातील केवळ पाणीच नाही बाहेर पडत. तर या पाण्यावाटे आयोडीन, पोटेशियम, कैल्शियम, क्रोमियम, कॉपर, आयर्न यांसारखे महत्वाचे घटक बाहेर पडत असतात. त्यामुळे हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्यासोबतच सूप, ज्यूस, नारळाचे पाणी, ताक, लिंबू सरबत यांचे रोज सेवन करा.
२. भरपूर फळ खा - लग्नाची खरेदी करताना बराच प्रवास केला जातो. या प्रवासादरम्यान भूक लागल्यास बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा फळ खा. फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील. फळांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळे तुमचा स्किन ग्लो देखील वाढेल.
३. मूठभर ड्रायफ्रुटस - फळांसोबतच रोज मूठभर आवडते ड्रायफ्रुटस जरूर खा. ड्रायफ्रुटस मधून तुमच्या शरीराची फायबर व प्रोटीनची गरज पूर्ण केली जाईल. यामुळे तुमचे मसल्स मजबूत होतील.
३. पुरेशी झोप - लग्नसराईच्या गडबडीत कित्येकदा आपली झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण नाही झाली तर तुमचा चेहरा फ्रेश दिसत नाही. लग्नाच्या दिवशी फ्रेश दिसण्यासाठी रोज किमान ८ तासांची झोप घ्यावी.
४. व्यायाम - तुम्हाला जे व्यायामाचे प्रकार आवडतात ते रोज करा. झुंबा, जिम, एरोबिक्स, चालणे, डान्स यांसारखे विविध पद्धतींचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे तुम्ही उत्साही राहाल व ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. व्यायाम केल्यामुळे तुम्हाला घाम येऊन बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होईल.
५. स्किनची काळजी - या काळात नवीन स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा चेहेऱ्यावर प्रयोग करू नका. नवीन प्रॉडक्ट तुमच्या चेहऱ्याची स्किन सहन करू शकेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही आधीपासून स्किनसाठी जे प्रॉडक्ट्स वापरत आहात त्यांचाच वापर करावा.