Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोण म्हणतं प्रोटीन्ससाठी खूप खर्च लागतो? भरपूर प्रोटीन्स देतात रोजच्या खाण्यातले ५ स्वस्त पदार्थ

कोण म्हणतं प्रोटीन्ससाठी खूप खर्च लागतो? भरपूर प्रोटीन्स देतात रोजच्या खाण्यातले ५ स्वस्त पदार्थ

What are 5 food high in protein : जर तुम्हाला आपल्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर सॅल्मन फिश, पनीर, पीनट बटर या पदार्थांचा आहारात समावेश करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:20 AM2023-04-18T11:20:01+5:302023-04-18T12:30:10+5:30

What are 5 food high in protein : जर तुम्हाला आपल्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर सॅल्मन फिश, पनीर, पीनट बटर या पदार्थांचा आहारात समावेश करा.

What are 5 food high in protein : Gym trainer told 5 high protein rich foods to bodybuilding | कोण म्हणतं प्रोटीन्ससाठी खूप खर्च लागतो? भरपूर प्रोटीन्स देतात रोजच्या खाण्यातले ५ स्वस्त पदार्थ

कोण म्हणतं प्रोटीन्ससाठी खूप खर्च लागतो? भरपूर प्रोटीन्स देतात रोजच्या खाण्यातले ५ स्वस्त पदार्थ

जर तुम्ही रोज जीम किंवा व्यायाम करत असाल तरीही स्नायू आणि मांसपेशींचा व्यवस्थित विकास होत नसेल तर तुम्ही आपल्या डाएटबाबत मोठी चूक करत आहात. चांगल्या शरीरासाठी फक्त व्यायामच नाही तर चांगला आहार घेणंही तितकंच महत्वाचं आहे. फक्त जिमला गेल्यानं आणि जास्त वजन उचलल्यानंच शरीर फिट राहतं असं नाही. तुम्हाला खाण्यापिण्याचीही तितकीच काळजी घ्यायला हवी. (What are 5 food high in protein)

मांसपेशींना ताकद मिळण्यासाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी शरीराला प्रोटीन्सची गरज असचे. जर तुम्ही रोजच्या आहारातल्या काही प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला तर तब्येत सुधारण्यास मदत होईल. प्रोटीन्स रिच फूड्स खाल्ल्यानं तुम्ही थकलेल्या शरीराला ताकदीनं भरू शकता. फिटनेस एक्सपर्ट्स इम्रान खान यांनी हाय प्रोटीन्स पदार्थांबद्दल माहिती दिली आहे. (Gym trainer told 5 high protein rich foods to bodybuilding)

ग्रीक योगर्ट

जर तुम्ही बॉडी बिल्डींग करत असाल तर ग्रीक योगर्ट तुमच्यासाठी प्रोटीन्सचा एक चांगला स्त्रोत आहे. दह्याच्या तुलनेत ग्रीक योगर्ट जास्त फायदेशीर असते. ७० ग्राम ग्रीक योगर्टमध्ये जवळपास ८ ग्राम प्रोटीन असते. एडिटिव्हस फूड कलरिंग, प्रिजर्वेटिव्हयुक्त फुड्सचे सेवन करू नये. 

काबुली चणे

पांढरे छोले म्हणजेच काबुली चण्यांमध्ये मासांच्या तुलनेत जास्त प्रोटीन असते. तुम्ही पांढरे चणे उकळून सॅलेडसह खाऊ शकता किंवा रात्री भिजवून वर्कआऊटनंतर खा, या पदार्थांमुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. 

काळे चणे

एक कप काळ्या चण्यांमध्ये १५ ग्राम प्रोटीन असते. हे शाकाहारींसाठी एक चांगला प्रोटीन स्त्रोत आहे. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. प्रोटीन्सव्यतिरिक्त यात कॉपर, मॅग्नेशियम आणि आयर्नही मोठ्या प्रमाणावर असते. 

क्विनोआ

प्रोटीन रिच फूड्समध्ये क्विनोआ मागे नाही. यात प्रोटीन्स व्यतिरिक्त आयर्न, स्टार्च, मॅग्नेशियम, व्हिटामीन बी-६ भरपूर प्रमाणात असते. क्विनोआचा वापरून तुम्ही खिचडी बनवू शकता. 

डाळी आणि शेंगा

जर तुम्ही मांसाहार करत नसाल किंवा शाकाहारी असाल तर प्रथिनांसाठी भरपूर डाळी आणि शेंगा खाव्यात. मसूर, मूग, काळे हरभरे, चवळी आणि काळे बीन्स इत्यादींमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. बॉडीबिल्डिंग लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

इतर पर्याय

जर तुम्हाला आपल्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर वर सांगितलेल्या पदार्थांशिवाय सॅल्मन फिश, पनीर, पीनट बटर या पदार्थांचा आहारात समावेश करा. फक्त प्रोटीन्सयुक्त पदार्थ खाल्ल्यानं बॉडी  बनत नाही तर रेग्युलर जिम केल्यानंही तब्येतीत सुधारणा होऊ शकते. प्रत्येकाच्या शरीराची प्रोटीन्सची गरज वेगवेगळी असू शकते म्हणून तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. 

Web Title: What are 5 food high in protein : Gym trainer told 5 high protein rich foods to bodybuilding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.