प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात कुकिंग ऑईल (Best Cooking OIl) हा एक महत्वाचा आणि रोज लागणारा पदार्थ आहे. तळण्यापासून, शिजवण्यापर्यंत, बेकिंगसाठीही तेलाची आवश्यकता असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे तेल उपलब्ध असतात. अनेकजण रोजच्या वापरासाठी हेल्दी कुकींग ऑईलच्या (Cooking Oil) शोधात असतात. तुम्ही रोजच्या जेवणासाठी जे तेल वापरता ते सुरक्षित असणं फार महत्वाचे आहे. तेलाची निवड करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवा. (What Are The Best 3 Cooking Oil)
प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा (Lavneet Batra) यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की कोणत्या 3 प्रकारचे कुकिंग ऑईल वापरल्याने स्वंयपाक उत्तम बनतो. त्यांनी पोस्टमध्ये सांगितले की, कोणतंही तेल परिपूर्ण नसते. तुम्ही स्वंयपाकघरात वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करू शकता.
एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल
जे लोक मेडिटेरेयिन डाएट घेतात ते आपल्या आहारात एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरू शकतात. आहार तज्ज्ञांनी सांगितले की या तेलात एंटी ऑक्सिडेटंस, पॉलिफेनोल आणि व्हिटामीन ई असते. ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. एंटी ऑक्सिडेंट्प्रमाणे जुन्या आजारांचा धोका कमी होतो. एक्सपर्ट्सच्यामते ऑलिव्ह ऑईलला वापर तुम्ही सॅलेडमध्येही करू शकता.
गाईचे तूप
गाईच्या तूपाचा स्मोकींग पॉईंट जास्त असतो. याचा अर्थ असा की तेलात त्याचे कम्पाऊंड्स न तुटता गरम होऊ शकतात. तुपात ब्युटिरिक एसिडचं हाय कॉन्स्ट्रेशन असते जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तूप सूज कमी करण्यास मदत करते. लवनीत बत्रा यांनी तळणं, भाजणं आणि उच्च आचेवर तेल गरम करण्यासाठी गाईच्या तूपाचा वापर करण्याच सल्ला दिला आहे.
मोहोरीचे तेल
लवनीत बत्रा यांनी व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलं की, राईच्या तेलात मोनोअनसॅच्युरेडेट आणि पॉलिअनसॅच्युरडेटेड फॅट्चे अधिक प्रमाणात असल्यास बॅड कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो आणि गुड कोलेस्टेरॉलचा स्तर वाढवण्यास मदत होते. राईच्या तेलात जिवाणूविरोधी गूण असतात. त्यामुळे मोहोरीच्या तेलाचा फोडणीसाठी वापर करू शकता.