Join us   

साळीच्या लाह्या म्हणजे तब्येतीसाठी अमृत! लक्ष्मीपूजनाला दाखवलेला लाह्या बत्तासे नैवैद्य आरोग्यासाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 9:21 PM

What are the Health benefits of Kheel Batasha during Diwali : दिवाळीत प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाह्या-बत्तासे उरलेत? फायदे पाहा, मग बाराही महिने आवर्जून खाल

दिवाळीनिमित्त (Diwali) प्रत्येकाकडे गोडधोड, फराळ यासह चमचमीत पदार्थ तयार केले जातात. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनानंतर अनेकांकडे साळीच्या लाह्या आणि बत्तासे प्रसाद म्हणून देण्यात येते. पण प्रसाद म्हणून देण्यात येणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. अनेकदा घरात साळीच्या लाह्या आणि बत्तासे उरतात, नंतर कोणी खायला मागत नाही. पण याचे फायदे ऐकाल तर, बाराही महिने आवर्जून खाल.

साळीच्या लाह्यांमध्ये आढळणारे गुणधर्म शरीरासाठी उपयुक्त ठरतात. शिवाय बत्तासे खाण्याचेही अनेक फायदे आहेत. आपण साळीच्या लाह्या बाराही महिने खाऊ शकता. साळीच्या लाह्या आणि बत्तासे का खावे? याची माहिती आयुर्वेद डॉक्टर दीपक कुमार यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याचे आरोग्यावर होणारे फायदे किती? पाहूयात(What are the Health benefits of Kheel Batasha during Diwali).

तोंडाचा अल्सर

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 'जर आपल्या तोंडात फोड येणे किंवा अल्सरचा त्रास होत असेल तर, यावर उपाय म्हणून साळीच्या लाह्या आणि बत्तासे खाऊ शकता. लाह्यांमुळे तोंडात होणारी वेदना कमी होईल. शिवाय सूजही काही अंशी कमी होईल.

दातांवर पिवळा थर-लहानशी कीड दिसतेय? ५ घरगुती उपाय- दातांचं भयानक दुखणं टाळा

अॅसिडिटी

दिवाळी मसालेदार, तळकट पदार्थांमुळे अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होतो. ज्यामुळे अपचन, पोट फुगणे, आंबट ढेकराचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपण साळीच्या लाह्या आणि बत्तासे खाऊ शकता. जे पचायला हलके असतात, शिवाय पोटाचे विकार दूर करतात.

किडनीचे आरोग्य सुधारते

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्यांसाठी साळीच्या लाह्या आणि बत्तासे खाणे फायदेशीर ठरू शकते. यातील गुणधर्मांमुळे याचा फायदा किडनीला होतो, व ती साफ होते.

बद्धकोष्ठता

जर आपण बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर, साळीच्या लाह्या आणि बत्तासे खा. यासाठी दुधात साळीच्या लाह्या आणि बत्तासे मिक्स करा, व याचे सेवन करा. शिवाय मसालेदर आणि तळकट पदार्थ कमी प्रमाणात खा.

४ प्रकारचे पौष्टिक दूध, वाढलेले कोलेस्टेरॉल होईल कमी, रक्ताभिसरण सुधारेल-हार्ट ॲटॅकचा धोका कमी

जुलाब

बऱ्याचदा तळकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांना जुलाबचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून आपण पाण्यात साळीच्या लाह्या आणि बत्तासे भिजवून खाऊ शकता. यामुळे आपल्याला लवकरच आराम मिळेल.

अंगदुखी

शरीरात अनेक कारणांमुळे वेदना होतात. अनेकांना हात-पाय, पाठदुखीचा त्रास होतो. यासाठी आपण साळीच्या लाह्या आणि बत्तासे खाऊ शकता. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. आपण हे दुधात मिक्स करून खाऊ शकता. ज्यामुळे एनर्जी बुस्ट होते.

टॅग्स : दिवाळी 2023आरोग्यहेल्थ टिप्स