Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मखाने दुधात उकळवून खाण्याचे ५ भन्नाट फायदे, अशक्तपणा होईल कमी - मुलांची हाडेही होतील मजबूत

मखाने दुधात उकळवून खाण्याचे ५ भन्नाट फायदे, अशक्तपणा होईल कमी - मुलांची हाडेही होतील मजबूत

What are the health benefits of mixing makhana in boiling milk : दुधात मखाना मिसळून खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते, व दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2023 03:09 PM2023-09-24T15:09:31+5:302023-09-24T15:28:17+5:30

What are the health benefits of mixing makhana in boiling milk : दुधात मखाना मिसळून खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते, व दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते

What are the health benefits of mixing makhana in boiling milk? | मखाने दुधात उकळवून खाण्याचे ५ भन्नाट फायदे, अशक्तपणा होईल कमी - मुलांची हाडेही होतील मजबूत

मखाने दुधात उकळवून खाण्याचे ५ भन्नाट फायदे, अशक्तपणा होईल कमी - मुलांची हाडेही होतील मजबूत

दूध आरोग्यासाठी चांगले मानले जाते. दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटस असतात. यामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात. दुधात मखाने घालून प्यायल्याने, दुधातील पौष्टीक घटक कैक पटीने वाढते. जे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. मखाने तब्येतीसाठी वरदानापेक्षा कमी नाही.

मखानामध्ये कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम, लोह, चरबी आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. दुधात मखाना उकळवून खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. अशक्तपणा ते साखरेतील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, दूध आणि मखाना एकत्रित करून खाणे फायदेशीर ठरू शकते. दुधात मखाने उकळवून खाण्याचे फायदे किती? याने शरीरात कोणते बदल घडतात? पाहूयात(What are the health benefits of mixing makhana in boiling milk).

अशक्तपणावर मात

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, जर आपल्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर, दुधात मखाना मिक्स करून खा. दूध आणि मखानामध्ये प्रोटीन आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. याचे नियमित सेवन केल्यास शारीरिक कमजोरी दूर होते.

नकळत वाढेल बीपीचा त्रास, वेळीच फॉलो करा ५ घरगुती सोपे उपाय, ब्लड प्रेशर होईल नॉर्मल

हाडे होतील मजबूत

दुधात मखाना भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. दूध आणि मखानेमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. नियमित दुधात मखाना उकळवून खाल्ल्याने हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

मधुमेहावर फायदेशीर

दुधात मखाना उकळवून खाण्याचे फायदे मधुमेहग्रस्त लोकांना अधिक होतो. मखानामध्ये हायपोग्लाइसेमिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो. मात्र, दुधात मखाना उकळवून पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हृदय निरोगी ठेवते

दुधात मखाना उकळवून खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मखनामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे पोषक घटक आढळतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. याचे नियमित सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत रोगांचा धोका कमी होतो.

झोपेची समस्या कमी होते

जर आपल्याला झोपेची समस्या असेल तर, दुधात मखाना उकळवून खा. दुधामधील आढळणारे घटक निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात मखाना मिसळून खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि झोपही चांगली लागते.

रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?

दुधात मखाना घालून शिजवण्याची योग्य पद्धत

एक ग्लास गरम दुधात, मुठभर मखाना घालून ठेवा. १० मिनिटानंतर मखाना सकट दूध प्या. दुधात मखाने मिसळून खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. मात्र, याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.

Web Title: What are the health benefits of mixing makhana in boiling milk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.