थंडीचे दिवस किंवा हिवाळा आणि सर्दी होणे हे एक समीकरणच आहे. कारण वातावरण खूप गार झालेलं असतं. त्यामुळे ते अनेकजणांना बाधतं आणि त्यामुळे लगेच सर्दी- खोकला होतो. हा व्हायरल त्रास असल्याने लगेच एकमेकांमध्ये पसरतो. थंड वातावरणामुळे हिवाळ्यात सर्दी होणं समजण्यासारखं आहे. पण काही जणांना चक्क सध्याच्या घाम फोडणाऱ्या उन्हाळ्यातही सर्दी होते, नाक गळतं आणि खूप शिंका येतात. असं का होत असावं बरं?(what are the reasons for cold in Summer?) बघुया यामागची नेमकी कारणं आणि उपाय...(reasons and home remedies for summer cold)
उन्हाळ्यात सर्दी का होते?
उन्हाळ्यात सर्दी होण्यामागे काय कारणं असू शकतात, याविषयी netmeds.com यांनी जी माहिती प्रकाशित केली आहे त्यानुसार थंडीमध्ये ज्याप्रमाणे व्हायरल संसर्ग होऊन सर्दी होत असते तसेच काहीसे उन्हाळ्यातल्या सर्दीचेही असते. दोन्ही प्रकारच्या सर्दीमध्ये काहीही फरक नाही.
मोठे लोंबते कानातले घातल्यावर कान दुखतात? अभिनेत्रींप्रमाणे ३ गोष्टी करा- त्रास होणार नाही
कधी कधी उन्हाळ्यात आपले खूप जास्त थंड खाणे होते. त्यामुळेही घसादुखी, खोकला येणे असा त्रास होऊ शकतो. थंडीमध्ये काही घरांमध्ये अजिबात पंखा लावला जात नाही. त्यानंतर उन्हाळा सुरू झाला की घरोघरी पंखा, कुलर, एसी सुरू होते. आपल्या शरीराला हा बदल सहन झाला नाही तर त्यामुळेही सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास होऊ शकतो. कधी कधी एखाद्या गोष्टीची ॲलर्जी होऊनही सर्दीचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यातल्या सर्दीवर काय उपाय करावे?
१. तुमची सर्दी हिवाळ्यातली असो किंवा मग उन्हाळ्यातली असो.. पुरेसा आराम करणे, शरीराला विश्रांती देणे हाच त्यावरचा उत्तम उपाय आहे. त्यामुळे सर्दी झाल्यावर आराम करा. खूप जास्त वर्कआऊटही करू नका.
कडाकड चावणाऱ्या डासांमुळे वैतागलात? बाल्कनीमध्ये ५ रोपं लावा- डास दूर पळून जातील
२. सर्दी झाल्यावर आपोआपच पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा येतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. थंड पाणी नको वाटत असेल तर कोमट पाणी करून प्या. त्यासोबतच वेगवेगळे सूप घेऊ शकता. किंवा मग आहारातले पातळ पदार्थांचे प्रमाण वाढवू शकता.