Join us   

लहान मुलांची दुखतेय पाठ, मणक्याचे छळतील त्रास; डॉक्टर सांगतात ३ कारणं- मुलांची पाठदुखी थांबवायची तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 2:00 PM

Major Reasons Of Backpain In Kids: पाठ दुखते अशी बहुतांश शाळकरी मुलांची तक्रार असते. बघा डॉक्टरांनी सांगितलेली त्यामागची कारणं...(why kids always complain about back pain?)

ठळक मुद्दे शाळेत जाणाऱ्या मुलांची पाठ दुखत असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत याविषयी....

मान दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे या समस्या वाढत्या वयासोबत सुरू झाल्या तर त्या आपण समजू शकतो. पण हल्ली बरीच शाळकरी मुलंही पाठ दुखते, मान दुखते अशा तक्रारी त्यांच्या पालकांकडे सतत करत असतात. बरेच पालक काहीतरी लागलं असेल किंवा खेळताना काहीतरी कमी-जास्त झाल्यामुळे पाठ दुखत असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करू नका. कारण मुलांच्या पाठदुखीवर वेळीच तोडगा काढला नाही, तर ताे त्रास त्यांना नेहमीसाठी छळू शकतो (what are the reasons of backpain in kids?). म्हणूनच मुलांच्या पाठदुखीमागची नेमकी कारणं काय आणि त्यावर काय उपाय करावा, ते पाहा...(why kids always complain about back pain?)

शाळकरी मुलांची पाठ का दुखते?

 

शाळेत जाणाऱ्या मुलांची पाठ दुखत असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत, याविषयी डॉ. पुनीत गिरधर यांनी दिलेली माहिती झी न्यूजने प्रकाशित केली आहेत. ती कारणं नेमकी कोणती ते पाहा..

दिवाळीच्या आधी त्वचेवर करा ग्लिसरीनची जादू! चेहरा एवढा चमकेल की सगळे बघतच राहतील.

१.  बॉडी पोश्चर

तुमच्या मुलांचे बॉडी पोश्चर कसे असते ते अभ्यास करायला कोणत्या स्थितीमध्ये बसतात किंवा शाळेमध्ये त्यांचे बेंच कशा पद्धतीचे आहेत, त्यावर बसून लिहिताना त्यांच्या पाठीला खूप बाक तर येत नाही ना या गोष्टी एकदा तपासून पाहा. मांडीवर वही ठेवून लिहिण्याची सवय अनेक मुलांना असते. यामुळे गरजेपेक्षा जास्त खाली वाकून लिहावे लागते. त्यामुळेही मुलांची पाठ, कंबर, मान दुखू शकते. त्यामुळे तुमच्या मुलांच्या बाबतीत पाठदुखीचे हे कारण तर नाही ना, हे एकदा तपासून पाहा..

 

२. दप्तराचे ओझे 

हल्ली शाळांमध्ये मुलांना लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण सगळेच विद्यार्थी त्याचा योग्य वापर करतील असे नाही. त्यामुळे तुमच्या मुलांच्या दप्तराचे ओझे किती आहे ते नियमितपणे तपासत राहा. खूप जास्त वेळ दप्तराचे ओझे पाठीवर असल्यामुळेही मुलांची पाठ, मान आखडून जाऊ शकते.

रेस्टॉरंटस्टाईल चमचमीत ग्रेव्ही करण्याची रेसिपी, एकाच ग्रेव्हीपासून करा १० वेगवेगळ्या भाज्या- घ्या रेसिपी

३. मार लागण्याची शक्यता

मुलं अवखळपणे खेळत असतात. अशावेळी त्यांच्या पाठीला, मानेला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरील दोन कारणं जर तुमच्या मुलांच्या बाबतीत वाटत नसतील, तर एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन मुलांची तपासणी करून घ्यायला हवी.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलंपाठीचे दुखणे उपाय