Join us   

What Are The Secrets To Living A Long Life : समोर आलं १०० वर्ष जगणाऱ्या लोकांच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट; आजच बदला खाण्यापिण्याच्या ५ सवयी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 11:53 AM

What Are The Secrets To Living A Long Life : जेवताना, जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुमचे पोट 80% भरले आहे, तेव्हा खाणे थांबवा.

प्रत्येकाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असते. निरोगी आयुष्यासाठी तुम्ही काय खाता आणि प्यावे हे खूप महत्वाचे आहे. जगातील सर्वात महागड्या वस्तू खाऊनच तुम्ही निरोगी राहू शकता असे नाही. तुमच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत हे महत्त्वाचे असते. (What are the secrets to living a long life) खाण्याचे काही मूलभूत नियम न पाळल्यास उत्तमोत्तम पदार्थ खाल्ल्यानेही आरोग्याला फायदा होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. चांगला आहार घेऊन तुम्ही शंभर वर्षे जगू शकता, पण तुम्ही काय, कधी, कसे आणि किती खात आहात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. वास्तविक, खाण्यापिण्याशी संबंधित या नियमांचा थेट फायदा शरीराला होतो. (Worlds longest living people reveals 5 eating habits to live to be 100 years)

70,000 पेक्षा जास्त अमेरिकन लोकांनी 2021 मध्ये त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान ते काय आणि कसे खातात याची माहिती तज्ज्ञांनी मिळवली आहे. त्यांच्या खाण्याच्या सवयींवर संशोधन करण्यात आले. या संशोधनातून जर एखाद्याला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर कोणत्या खाण्याच्या सवयी पाळल्या पाहिजेत. याचा उलगडा झाला. (Secrets to a Long Life According to People Who Lived to 100)

शेंगा

शेंगा हे जादुई अन्न मानले गेले आहे. विविध प्रकारच्या शेंगांचे नियमित सेवन करणे हा आरोग्य राखण्याचा उत्तम मार्ग आहे. शेंगांमध्ये  ब्लॅक बीन्स आणि अगदी सोयाबीन आणि डाळी यांचा समावेश होतो.

 रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब

८० टक्केच जेवा

जेवताना, जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुमचे पोट 80% भरले आहे, तेव्हा खाणे थांबवा. वास्तविक, भूक न लागणे आणि पोट भरणे यात २०% फरक असावा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात हे उघड आहे. 

उन्हाळ्यात टाकीतलं पाणी खूप तापतं? पाणी थंडगार ठेवण्यासाठी ४ टिप्स

दिवस जसजसा मावळतो तसे कमी खा

असे मानले जाते की दिवस मावळत असताना मानवी शरीराने कमी कॅलरीज घेतल्या पाहिजेत. काही लोक रात्रीच्या वेळी त्यांचे सर्वात कमी जेवण जेवतात. रात्री उशिरा काहीही खाऊ नका. दिवसाच्या सुरुवातीला जास्त खा याऊलट झोपण्याच्या वेळेला कमी खा.

कमी पण पौष्टीक पदार्थ खा

निरोगी राहण्यासाठी, आपण खूप खाणे आवश्यक नाही. खरं तर, आपल्या ताटात कमी पण पौष्टिक गोष्टी असाव्यात. शंभर वर्षांहून अधिक काळ जगलेले हे लोक कमी पण पौष्टीक पदार्थांचा जेवणात समावेश करतात.

मांसहार टाळा

मांसाऐवजी वनस्पती-आधारित आहार घेतल्यास शरीर दीर्घकाळ मजबूत होण्यास मदत होते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.  जास्त काळ जगलेले लोक महिन्यातून सरासरी पाच वेळाच मांस खातात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न