Join us   

ऐन तारुण्यात हार्ट ॲटॅक येतो कारण ५ हमखास होणाऱ्या लाइफस्टाइल चुका, तुम्हीही असंच वागताय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 5:52 PM

What Causes a Heart Attack at a Young Age? तरुणांमध्ये हार्ट ॲटॅक त्यातून होणारे मृत्यू याचे प्रमाण का वाढते आहे?

युवकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. पूर्वी सहसा वृद्धांना हृदयविकाराचा झटका यायचा, परंतु, आता कमी वयात लोकांना हार्ट अॅटॅक येत आहे. सध्यस्थितीत २५ टक्के तरुणांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं निष्पन्न झालं आहे. या बदलाचे प्रमुख कारण म्हणजे तरुणांची बदलती जीवनशैली. बिघडलेल्या लाईफशैलीमुळे फक्त हृदयविकार नसून, इतर गंभीर समस्या देखील उद्भवत आहे. वेळेवर जेवण न करणे, योग्य आहाराचे सेवन न करणे, वेळेवर न झोपणे, यासह अशा असंख्य कारणांमुळे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे(What Causes a Heart Attack at a Young Age?).

यासंदर्भात, गाझियाबादस्थित मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार हृदयरोग तज्ज्ञ डॉ अभिषेक सिंह यांनी, तरुण वर्गाने हृदयाच्या निगडीत समस्या होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी? याची माहिती दिली आहे.

लठ्ठपणामुळे कोलेस्टेरॉल वाढते

लठ्ठपणामुळे हृदयाच्या निगडीत समस्या वाढू शकतात. तरुण वर्ग हेल्दी फूड सोडून, फास्ट फूड खाण्यास प्राधान्य देत आहेत. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते. वाढत्या वजनामुळे हृदयावर दबाव पडतो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हे खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. ज्यामुळे नसा ब्लॉक होतात. ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होत नाही. त्यामुळे उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करायला हवा.

सतत भूक लागते, खाल्लं की झोप येते? हा ‘फूड कोमा’ तर नाही, पाहा ते काय असते..

अपुरी झोप

बिझी लाईफस्टाईल आणि मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे अपुऱ्या झोपेची समस्या वाढू लागली आहे. शरीराला व्यायामाची सवय हवी. यामुळे बॉडी थकते, व आपल्याला गाढ झोप लागते. नियमित व्यायामामुळे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता वाढते. व्यायामामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल आणि फॅट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे व्यायाम गरजेचं आहे.

जॉब स्ट्रेस

आजकालचे युवक त्यांच्या करिअर व नोकरीला घेऊन सतत तणावात राहतात. स्पर्धात्मक वातावरणामुळे तणाव वाढला आहे. ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईनसारखे हार्मोन्स वाढतात. यामुळे रक्तदाब वाढतो. जर ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात.

ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

अ‍ॅल्कोहोल - सिगारेट सोडा

अ‍ॅल्कोहोल आणि सिगारेटच्या वाईट व्यसनाचा थेट परिणाम हृदयावर होतो. यामुळे हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. हृदयाच्या ठोक्यात अडथळा निर्माण होऊ लागते. याव्यतिरिक्त रक्तात गुठळ्या तयार होतात. व रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा सुरळीत प्रवाह कमी होतो. त्यामुळे ही वाईट सवय आजच सोडा.

टॅग्स : हृदयविकाराचा झटकाहृदयरोगहेल्थ टिप्सआरोग्य