Join us   

पचनाचे त्रास-पोटदुखीचा वैताग नको तर जेवण झाल्यावर हमखास होणाऱ्या ५ चुका टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 8:55 PM

What Causes Indigestion Pain After Eating : नकळत होणाऱ्या ५ चुका टाळल्या तर पोट बिघडणार नाही

धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात गंभीर आजार उद्भवतात. मुख्य म्हणजे योग्य आहाराचे सेवन न करणे, व्यायामाचा अभाव, यासह निद्रानाशामुळे इतर आजारही तितक्याच प्रमाणात वाढतात. काही वेळेला या तिन्ही गोष्टी करूनही नकळत घडणाऱ्या चुकांमुळे आरोग्याला हानी पोहचू शकते. ज्यामुळे पचनक्रिया तर बिघडतेच, यासह लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाच्या निगडीत समस्या वाढतात.

जर गंभीर आजाराचा त्रास होऊ नये, असे वाटत असेल तर, जेवल्यानंतर ५ चुका करणे टाळा. लखनऊस्थित किनर्क जॉर्ज मेडिकल कॉलेजच्या आहारतज्ज्ञ काजल तिवारी यांनी माहिती दिली आहे(What Causes Indigestion Pain After Eating?).

जेवल्यानंतर लगेच झोपणे

जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळायला हवे. अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. परंतु, यामुळे छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नये, किमान दोन ते तीन तास बसा किंवा शतपावली करून झोपा.

रोज पोळ्या करताना गव्हाच्या पिठात मिसळा १ गोष्ट चमचाभर, वजनच काय शुगरही होईल कमी

निकोटीनचे सेवन

अन्न खाल्ल्यानंतर निकोटीनचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. अनेकांना जेवल्यानंतर चहा, कॉफी पिणे किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते. असे केल्याने शरीरात निकोटीनचे प्रमाण वाढते. ज्याचा थेट परिणाम अन्नाच्या पोषणावर होतो, शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

जेवल्यानंतर आंघोळ करू नका

आंघोळीनंतर खाण्याची सवय सर्वोत्तम मानली जाते. पण बरेच लोक जेवल्यानंतर लगेच अंघोळ करतात, जे चुकीचे आहे. असे केल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो आणि अपचनाचा त्रास होतो.

भरपूर पाणी पिणे

लोक अन्न खाल्ल्यानंतर लगेचच जास्त पाणी पितात, ही एक वाईट सवय आहे. असे केल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, जेवल्यानंतर सुमारे ३० मिनिटानंतर पाणी प्या.

रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याचे पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे, वजन होईल कमी- सुधारेल पचन झटपट

हेवी वर्कआउट

जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. असे केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे उलटी किंवा पोटदुखी देखील होऊ शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य