Join us   

रतन टाटांना आवडत असे साधे जेवण; फ्रूट कस्टर्ड ही स्वीट डिशही होती प्रिय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 6:28 PM

What did Ratan Tata love to eat? Discover his favorite foods : रतन टाटांचा साधेपणा त्यांच्या आहारातही दिसतो. त्यांना साधे-स्थानिक पदार्थ आवडत.

रतन टाटा (Ratan Tata). सामाजिक मूल्यांची जाण ठेवून उद्योग वाढवणारा उद्योगपती (Businessman). ते त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात. त्यांच्या निधनाने साऱ्या देशावर शोककळा पसरली. त्यांच्या साधेपणाच्या अनेक आठवणी अनेकांनी शेअर केल्या (Ratan Tata Demise).  रतन टाटा फिटनेस प्रेमी होते तसे खाण्याचे शौकीनही होते (Food).

मात्र त्यांना जेवणही साधं आवडत असे. पारशी खाद्यसंस्कृतीतले साधे पदार्थ विशेषत: धनसाक त्यांना आवडत असे. पावभाजी, वडापाव हे मुंबईकर पदार्थ आवडत तसे डोसा आणि सुशीही. आवडत्या गोड पदार्थांत कस्टर्ड आणि फ्रूट कस्टर्डही (Fruit Custard) त्यांना विशेष प्रिय होते असे अनेक शेफ सांगतात.

रतन टाटा यांनी खुद्द एका मुलाखतीत, त्यांना फ्रूट कस्टर्ड खायला आवडत असल्याचं सांगितलं होतं. प्रोसेस फूड आणि जंक फूड त्यांना आवडत नसे. चहा आवडायचा पण तो अती होऊ नये म्हणूनही ते काळजी घेत. भरपूर सुकामेव आणत्र ताजी रसरशीत फळं आणि कस्टर्ड हे कॉंबिनेशन असलेलं फ्रूट कस्टर्ड मात्र ते आवडीने खात. कस्टर्ड गोड खाण्याचा आनंदही देतं आणि फळांचे पोषणही मिळते.

सत्तरी पार करणारी रेखा 'या' ट्रेण्डी साड्यांमुळे दिसते तिशीतली; ट्राय करा 'हे' ७ सुंदर साड्या - मिळेल रिच लूक

फ्रूट कस्टर्ड आपल्यालाही आवडत असेल तर?

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. रितिका समद्दार सांगतात, 'फ्रूट कस्टर्डमध्ये जीवनसत्वं, फायबर, कर्बोदके असतात. लहान मुलंही हा पदार्थ आवडीने खातात. पोटभर फळं त्यानिमित्तानं खाऊ शकतात. सिझनल फळं विविध प्रकारे खाल्ल्याने शरीराला लाभच होतो.  केळी, सफरचंद, संत्री आणि द्राक्षे यासह सर्वच स्थानिक फळं त्या त्या ऋतूत खायला हवीत. फळांचं कस्टर्ड हा त्यातला वेगळा गोड पदार्थ खाण्याचा सोपा प्रकार. तो झटपट करताही येतो.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

कस्टर्ड पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात. थकवा दूर करण्याचा हा एक गोड उपाय आहे. त्यामुळे थकवा आला असेल, जरा डाऊन वाटत असेल तर फ्रूट कस्टर्ड खाण्यास हरकत नाही.

टॅग्स : रतन टाटाअन्न