वयाच्या तिशीनंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं पडतं. तर काही लोकं तिशीच्या आतच घराची जबाबदारी सांभाळतात. ८ तासांचं काम, बिघडलेली जीवनशैली (Lifestyle), यासह सकस आहाराचे सेवन न करणे यामुळे बरेच आजार आरोग्याला छळतात. महिला असो किंवा पुरुष दोघांनाही कामाच्या व्यापामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.
तिशीनंतर (Diet after 30s) स्वतःच्या आरोग्याची उत्तमरित्या काळजी घेतली तर, पन्नाशीपर्यंत कोणतेही आजार आरोग्याला त्रास देणार नाही. तिशीनंतर सुदृढ शरीर व गंभीर आजारांपासून स्वतःचे सरंक्षण करायचं असेल तर, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याची माहिती पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी दिली आहे(What Diet Should Women Above 25 Eat For A Healthier Future).
तिशीनंतर सुदृढ शरीर हवंय? तर मग आहारात हवेच ५ पदार्थ
फायबरयुक्त आहार खा
फायबरयुक्त आहार खाल्ल्याने हृदयविकार, स्ट्रोक, टाईप-२ मधुमेह यासह कोलेस्टेरॉलचा धोका कमी होतो. ३१ ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनी दररोज २५ ग्रॅम फायबरचे सेवन करायला हवे. यासाठी आहारात फायबरयुक्त फळे, भाज्या, कडधान्य, सुका मेवा आणि बियांचा समावेश करा.
डॉक्टर नेने सांगतात उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ५ गोल्डन रुल्स, मधुमेह-लठ्ठपणाचा होणार नाही त्रास
ओमेगा - ३
ओमेगा - ३ हे अत्यावश्यक फॅटी अॅसिड आहे. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी शिवाय मेंदू योग्यरित्या कार्य करण्यासाठी, आहारात ओमेगा - ३ युक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी नियमित अळशीच्या बिया, अक्रोड, चिया सीड्स, शेंगदाणे आणि भोपळ्याच्या बिया खा.
कॅल्शियम
हाडांना बळकटी मिळावी यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. कॅल्शियम हे एक हाडे मजबूत करणारे पोषक घटक आहे. ३१ ते ५० वर्षीय वयोगटातील लोकांनी नियमित १००० मिलीग्राम कॅल्शियमयुक्त पदार्थ खावे. यासाठी चीज, दही, डेअरी प्रॉडक्ट्स, ब्रोकोली, पालक आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
प्रोटीन
प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन केल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजनही नियंत्रित राहते. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने कमजोरी, रक्ताची कमतरता, शिवाय वजन वाढण्याच्या समस्या सुटतात. यासाठी नियमित सोयाबिन, क्विनोआ, चिया सीड्स, मुग डाळीचे पदार्थ खा.
आयर्न
तिशीनंतर महिलांना अॅनिमियाचा धोका जास्त असतो. आहारात आयर्नच्या कमतरतेमुळे आपण वारंवार आजारी पडतो. त्यामुळे आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी नियमित हिरव्या पालेभाज्या, डाळ, बिन्स, पनीर, लिंबू, संत्री इत्यादी पदार्थ खा. यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढू शकते.