सध्याच्या काळात उच्च रक्तदाब सामान्य समस्या बनत चालली आहे (Blood Pressure). फक्त वयस्कर नसून, प्रत्येक वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाब हा एक प्रकारचा सायलेंट किलर आहे. जेव्हा रक्तदाब 120/80 mmHgची पातळी ओलांडते तेव्हा शरीराला जास्त धोका निर्माण होतो. शिवाय जगभरातील मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. अनुवांशिक असण्यासोबतच खराब जीवनशैली, आहार आणि तणावामुळेही उच्च रक्तदाबेचा त्रास वाढू शकतो.
उच्च रक्तदाबेचा त्रास वाढत गेला तर, वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे (Health Care). त्यामुळे उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सकाळी उठल्याबरोबर ही ५ लक्षणे दिसली तर समजून घ्या, की आपला रक्तदाब वाढत आहे. पण कोणती आहेत ती लक्षणं याची माहिती, फॅमिली फिजिशियन डॉ. रमण कुमार यांनी दिली आहे(What does high blood pressure in the morning mean?).
उच्च रक्तदाबाची सकाळची लक्षणे
चक्कर येणे
सकाळी उठल्यानंतर चक्कर येणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. सकाळी उठल्याबरोबर चक्कर येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अंथरुणातून उठल्यावर लगेच चक्कर येत असेल तर नक्कीच रक्तदाब तपासा. शिवाय ब्लड प्रेशरवर वेळीच उपचार घ्या.
हेल्दी पदार्थ असूनही जर कुकिंग ऑईल खराब असेल तर? तब्येत चांगली राहावी म्हणून वापरा ५ तेल
सकाळी तहान लागणे
सकाळी उठल्याबरोबर तहान लागल्यास हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. जर आपल्यला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर, सकाळी तोंड कोरडे जाणवू लागेल. विशेषतः सकाळी उठल्याबरोबर तहान लागू शकते. जर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर खूप तहान लागत असेल तर, तज्ज्ञांकडून रक्तदाब तपासून घ्या.
अंधुक दृष्टी
सकाळी उठल्याबरोबर अंधुक दृष्टी दिसली तर ते उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. म्हणजेच उच्च रक्तदाब डोळ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. जर आपला रक्तदाब वारंवार वाढत असेल तर तुमचे डोळे देखील कमकुवत होऊ शकतात. म्हणून, अशा परिस्थितीत, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उलट्या आणि मळमळ
उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्या देखील उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. सकाळी उठल्यावर मळमळ वाटत असेल तर, रक्तदाब तपासा.
झोपेवर परिणाम
जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा त्याचा झोपेवरही परिणाम होतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना रात्री झोपण्यास त्रास होऊ शकतो. म्हणूनच त्यांना सकाळी अनेकदा झोप येते. ज्यामुळे त्यांची चिडचिडही होऊ शकते.