शरीरात लोहाचा अभाव असेल तर, शरीर धोक्याचे संकेत देते (Health Tips). स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता असणे सर्वात सामान्य आहे. पाळीच्या काळात जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर अधिक लोहाची गरज भासते (Anemia). हिमोग्लोबिनचा सर्वात महत्त्वाचा घटक लोह असतो. रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते जे शरीराला ऑक्सिजन पुरवते.
शरीरात लोहाची कमतरता भासू नये म्हणून, लोहयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. परंतु, काही चुकांमुळेही शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. जर आपल्याही शरीरात लोहाची कमतरता भासत असेल तर, वेळीच ४ पदार्थ खाणं टाळायला हव्या; यामुळे रक्ताभिसरणात अडचण येणार नाही. शिवाय लोहाची कमतरताही भासणार नाही(What Foods Are Good and Bad for Your Diet if You Have Anemia?).
नाश्ता वगळणे
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सकाळचा नाश्ता कधीही वगळू नये. नाश्ता स्किप केल्याने उर्जेची पातळी कमी होते. शिवाय शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाही. जर आपल्या शरीरात लोहाची कमतरता भासत असेल तर, नाश्त्यामध्ये लोहयुक्त पदार्थ खा.
भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..
खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे
अमेरिकन सोसायटी फॉर न्यूट्रिशनने केलेल्या अभ्यासानुसार, जेवणाच्या एका तासाच्या आत चहा किंवा कॉफी प्यायल्याने लोहाचे शोषण ६० टक्के कमी होते. चहा आणि कॉफी दोन्हीमध्ये टॅनिन आणि पॉलीफेनॉल नावाची संयुगे असतात. ज्यामुळे लोहाचे शोषण योग्यरित्या होत नाही. त्यामुळे खाल्ल्यानंतर लोहयुक्त पदार्थ खाणं टाळावे.
लोहयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे
लोहयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे हिमोग्लोबिनसारखी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आहारात लोहयुक्त पदार्थांचा नक्कीच समावेश करा.
बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट
कॅल्शियम
ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशन यांच्या अभ्यासानुसार, अधिक प्रमाणात कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. कॅल्शियमचा ओव्हरडोस अन्नपदार्थांमधील लोह शरीरात मिसळू देण्यास अडथळा आणतो. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात करायला हवं.