Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

What foods give you instant energy after fasting : उपवास म्हणून काहीच खायचं नाही किंवा चहाच प्यायचा असं करु नका, तब्येत सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 10:16 PM2023-10-12T22:16:14+5:302023-10-12T22:43:10+5:30

What foods give you instant energy after fasting : उपवास म्हणून काहीच खायचं नाही किंवा चहाच प्यायचा असं करु नका, तब्येत सांभाळा

What foods give you instant energy after fasting, How do I stay energized while fasting | नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

नवरात्रीला अवघे काहीच दिवस उरले आहेत. एकूणच सगळीकडे नवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे. नवरात्र म्हटलं की आपल्याला आठवतात ते नऊ दिवसांचे उपवास व गरबा. नवरात्रीत बरेचजण उपवास करतात. काहीजण संपूर्ण नऊ दिवस उपवास (How do I stop feeling tired when fasting?) करतात, तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले दोन किंवा शेवटचे दोन दिवस असे जोड्यांमध्ये उपवास करतात. नवरात्रीच्या उपवासातही अनेक प्रकार आहेत. काही लोक या नऊ दिवसात फक्त पाणी घेतात, तर काही फळे खातात आणि काही लोक दिवसातून एक वेळ खातात(Keeping A Fast? Try These Food Items To Boost Energy While Fasting).

नवरात्रीत आपण श्रद्धेने उपवास धरतो खरे, परंतु काहीवेळा खाण्याचा समतोल नीट न राहिल्यामुळे आरोग्याच्या काही समस्यांना (Feeling exhausted due to fasting? Eat this!) सामोरे जावे लागते. काहीवेळा उपवास केल्याने आपले शरीर सुधारण्यास मदत होते. परंतु काहीवेळा उपवासामुळे पोटाशी संबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या निर्माण होतात. उपवास करण्यामागे आपली श्रद्धा असली तरी ते उपवास त्रासदायक होऊ नयेत यासाठी आहारातील काही गोष्टींकडे (Feel tired? Do This To Stay Focused While Fasting) लक्ष देणे आवश्यक असते. असे असले तरीही उपवास करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचे असते. वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर या उपवासाचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे (How do I stay energized while fasting?) लागतात. उपवासा दरम्यान बराच काळ काही न खाता राहिल्याने आपल्याला कधी कधी थकवा जाणवतो. अशावेळी इन्स्टंट एनर्जी मिळवून देणारे काही पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत(Feeling sluggish while fasting on Navratri? Simple ways to keep your energy levels up).

उपवासा दरम्यान थकवा जाणवल्यास कोणते पदार्थ खावेत ? 

१. साबुदाणा :- साबुदाणा खिचडी, लाडू इत्यादी उपवासात खाल्ले जाणारे लोकप्रिय पदार्थ आहेत. हे पचायलाही खूप सोपे असतात. जर आपल्याला हे पदार्थ आवडत असतील तर आपण ते गोड किंवा खारट स्वरूपातही खाऊ शकता. सतत साबुदाणा किंवा बटाटा खाण्यापेक्षा उपवासाच्या थालीपीठाची भाजणी, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा पीठ हे आरोग्यदायी असते. हे पचायला तर हलके असतेच पण याने पोटही भरते.

कोण म्हणतं साबुदाणा नको, खाऊन तर पाहा साबुदाण्याची बर्फी - उपवासासाठी स्पेशल एनर्जीचा डोस...

२. सुकामेवा :- पोषक तत्वांनी युक्त सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जेची गरज असते, अशा परिस्थितीत आपण सुकामेवा खावा. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आपले पोट जास्त काळ भरलेले राहते आणि फारशी भूकही लागत नाही. उपवासाच्या दिवसात काहीवेळा एकदम एनर्जी डाऊन वाटते, अशावेळी खाण्यासाठी खजूर रोल, दाण्याचे लाडू, सुकामेव्याचे लाडू असे पदार्थ घरच्या घरी करुन ठेऊ शकता. 

३. दही :- उपवासात दही खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहते. हे इन्स्टंट एनर्जी फूड म्हणून काम करते. दही खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि शरीर डिटॉक्सिफाय होते. उपवासा दरम्यान आपण दही वापरून अनेक प्रकारच्या रेसिपीज बनवू शकता.

नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...

४. थंड पेय :- ऑक्टोबर हिट असल्याने उपवासा दरम्यान शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी ताक, सरबत, शहाळे ही पेये घेऊ शकता.

नवरात्र स्पेशल : साबुदाण्याची खिचडी - वडे नकोसे वाटतात ? ट्राय करा उपवासाची मऊ, जाळीदार इडली, झटपट रेसिपी...

५. फळे व भाज्या :- उपवासा दरम्यान येणारा थकवा घालवण्यासाठी आपण फळे आणि भाज्या खाऊ शकता. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता दूर होते. याशिवाय वजन कमी करण्यासही मदत होते. उपवासाच्या ताटात आपण काकडी, टोमॅटो, संत्री, पपई, बीटरूट यांचा समावेश करु शकता. या उपवासाला भेंडी, राजगिरा, लाल भोपळा, रताळे यांसारख्या भाज्या चालतात. तसेच उपवासाला सर्व प्रकारची फळे चालतात.

Web Title: What foods give you instant energy after fasting, How do I stay energized while fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.