Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अंगात रक्त कमी होणं, अशक्तपणावर तज्ज्ञांनी सांगितला उपाय; ८ दिवसात वाढेल हिमोग्लोबिन

अंगात रक्त कमी होणं, अशक्तपणावर तज्ज्ञांनी सांगितला उपाय; ८ दिवसात वाढेल हिमोग्लोबिन

What foods increase hemoglobin : हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर चिडचिड होणं, हातपाय थंड पडणं, चक्कर येणं, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, ब्लड क्लोटींग न होणं अशी लक्षणं जाणवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 01:51 PM2023-07-16T13:51:04+5:302023-07-16T20:59:40+5:30

What foods increase hemoglobin : हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर चिडचिड होणं, हातपाय थंड पडणं, चक्कर येणं, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, ब्लड क्लोटींग न होणं अशी लक्षणं जाणवतात.

What foods increase hemoglobin : Top Hemoglobin Foods That can Increase your Hemoglobin | अंगात रक्त कमी होणं, अशक्तपणावर तज्ज्ञांनी सांगितला उपाय; ८ दिवसात वाढेल हिमोग्लोबिन

अंगात रक्त कमी होणं, अशक्तपणावर तज्ज्ञांनी सांगितला उपाय; ८ दिवसात वाढेल हिमोग्लोबिन

आयर्न हिमोग्लोबिन शरीरातील एक आवश्यक घटकांपैकी एक आहे. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. जे रक्तात ऑक्सिजन पोहोचवण्यास फार महत्वाचे असते. याशिवाय शरीरााचे तापमानही नियंत्रणात राहते. तज्ज्ञांच्यामते व्यक्तीनं कमीत कमी १.८ मिलीग्राम आयर्नचे सेवन करायला हवे. शरीरात रक्ताची कमतरता उद्भवल्यास एनिमियाचा त्रास उद्भवतो. (What foods increase hemoglobin)

हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर चिडचिड होणं, हातपाय थंड पडणं, चक्कर येणं, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, ब्लड क्लोटींग न होणं अशी लक्षणं जाणवतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण जास्त असते. हार्टकेअर आणि लाईफस्टाईल एक्सपर्ट डॉ. बिमल चहाजर यांनी नैसर्गिकरित्या शरीरातं रक्त वाढवण्यासाठी काय खायचं याबाबत उपाय सांगितले आहे. (Top Hemoglobin Foods That can Increase your Hemoglobin Naturally)

१) नॅशनल एनिमिया एक्शन काऊंसिलनुसार रक्ताची कमतरता एनिमिया आणि कमी हिमोग्लोबिनच्या स्तराचे एक सामान्य कारण आहे. आहारात अंडी, याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या पालक, बीट यांचा समावेश करा. सफरचंद,  भोपळाच्या बीया, बदाम, मनुके अशा पदार्थांचे सेवन करा. 

२) आयर्नयुक्त पदार्थ खाल्ल्यास शरीरातील व्हिटामीन सी ची कमतरता भरून काढण्यासही मदत होईल. संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरीपासून ते पपई, भोपळी मिरची, ब्रोकोली, द्राक्ष आणि टोमॅटो या खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

३) फॉलिक एसिड, एक बी - कॉम्प्लेक्स व्हिटामीन आहे. जे लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, केल  आणि ब्रोकोली  यांच्या सेवनानं शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. 

४) कॉफी, चहा, कोला ड्रिंक्स, वाईन आणि बिअर यांसारखी पेये तुमच्या शरीराच्या लोह शोषून घेण्याच्या क्षमतेत अडथळा आणू शकतात. त्यामुळे तुमचे हिमोग्लोबिन कमी असल्यास साखरेचे प्रमाण जास्त असलेले पेय टाळा.

५) मीडियम टू हाय इंटेसिटी व्यायाम केल्यानंतरही शरीर हिमोग्लोबीन वाढवते. या व्यामामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी हिमोग्लोबीनयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करायला हवा. 

६) डाळिंब, पेरू, टोमॅटो, खजूर खाल्ल्यानं रक्ताची कमतरता दूर होते.  गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्यानही शरीरातील रक्त वाढते.  
 

Web Title: What foods increase hemoglobin : Top Hemoglobin Foods That can Increase your Hemoglobin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.