तब्येत बिघडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. त्यांना आपले दुखणे सांगतो. डॉक्टर आपल्यावर उपचार करतात. व दुखणे बरे करण्यासाठी औषध देतात. या औषधांमुळे आपली तब्येत ठणठणीत होते. पण काही वेळेला औषधांचा प्रभाव आपल्या शरीरावर होत नाही. तब्येत बरी होण्याऐवजी समस्या वाढते. खरंतर यामागे आपल्याकडून नकळत होणाऱ्या काही चुका देखील असू शकतात. ज्यामुळे औषधांचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होत नाही.
डॉक्टर औषध लिहून देण्यासोबत काही माहितीही देतात, पण आपण त्याचे पूर्ण पालन करत नाही. ज्यामुळे औषधांचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होत नाही. यासंदर्भात, मेदांता- द मेडिसिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. राजीव पारीख सांगतात, '' कोणतेही औषध घेताना ४ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. तरच औषधांचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो''(What four rules should you follow when taking medicine?).
औषध घेण्याचे ४ महत्वाचे नियम
प्रत्येक औषध वेळेवर घ्या
डॉक्टर राजीव सांगतात, ''प्रत्येक औषध दररोज डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या वेळेवर घ्यायला हवे. अर्धा-पाऊण तास उशीर झाला तर चालते, पण त्याहून अधिक वेळ झाला तर, कदाचित औषधांचा योग्य प्रभाव आरोग्यावर होणार नाही. दररोज नियमित वेळेवर औषधे खावीत. या एका चुकीमुळे औषधांची लेव्हल बदलते, व रोग वेळेवर बरे होत नाही.
रात्री झोपताना दूध प्यावं का? कुणी आणि किती प्यावं? तज्ज्ञ सांगतात, दूध का दूध..
औषध घेण्याची योग्य पद्धत
डॉक्टरांच्या मते, औषध वेळेवर घेणं महत्वाचं आहे. औषध रिकाम्या पोटी घ्यावे की, जेवल्यानंतर खावे हे पाहून औषध खाणे महत्वाचे आहे. कारण अनेक औषधांचा प्रभाव हा रिकाम्या पोटी होतो. तर, काही औषधांचा प्रभाव जेवल्यानंतर होतो.
औषधांचा कोर्स पूर्ण करा
जेव्हा आपण कोणताही रोग बरा करण्यासाठी औषध खातो, तेव्हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आठवडा किंवा महिन्याचा कोर्स पूर्ण करावा. बहुतांश लोकं तब्येत ठीक झाल्यानंतर औषधे घेणे बंद करतात. त्यामुळे रोग मुळापासून नष्ट होऊ शकत नाही. योग्य वेळी योग्य प्रमाणात औषध घेणे आवश्यक आहे.
रोज सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ला तर कोलेस्टेरॉल खरंच कमी होते? तज्ज्ञ सांगतात..
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध खा
बहुतांश लोकं स्वतःहून किंवा केमिस्टच्या सल्ल्याने औषधे खातात. परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. काहीवेळेला रोग गंभीर देखील असू शकतात. ज्यामुळे औषधांचा गंभीर दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.