Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > इस्ट्रोजेन हार्मोन वाढले तर महिलांना उद्भवतात अनेक समस्या, तज्ज्ञ सांगतात त्याची लक्षणं आणि उपाय

इस्ट्रोजेन हार्मोन वाढले तर महिलांना उद्भवतात अनेक समस्या, तज्ज्ञ सांगतात त्याची लक्षणं आणि उपाय

इस्ट्रोजेन हार्मोनमुळे (Estrogen) महिलांच्या शरीरात लैंगिक विकास घडून येतो. पण जर हे इस्ट्रोजेन जास्त प्रमाणात वाढल्यास ( effect of high estrogen) त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वेगवेगळे परिणामही जाणवतात. शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचा स्तर वाढल्यास तो कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी उपायही (solutions on high estrogen) सांगितले आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 02:32 PM2022-08-02T14:32:38+5:302022-08-02T14:41:36+5:30

इस्ट्रोजेन हार्मोनमुळे (Estrogen) महिलांच्या शरीरात लैंगिक विकास घडून येतो. पण जर हे इस्ट्रोजेन जास्त प्रमाणात वाढल्यास ( effect of high estrogen) त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वेगवेगळे परिणामही जाणवतात. शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचा स्तर वाढल्यास तो कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी उपायही (solutions on high estrogen) सांगितले आहेत. 

What happen if estrogen level high in women's body? High estrogen symptoms and treatment | इस्ट्रोजेन हार्मोन वाढले तर महिलांना उद्भवतात अनेक समस्या, तज्ज्ञ सांगतात त्याची लक्षणं आणि उपाय

इस्ट्रोजेन हार्मोन वाढले तर महिलांना उद्भवतात अनेक समस्या, तज्ज्ञ सांगतात त्याची लक्षणं आणि उपाय

Highlights महिलांच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत इस्ट्रोजेनचं प्रमाण जास्त असतं. इस्ट्रोजेनचा स्तर वाढल्यास त्याचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. आहार आणि जीवनशैलीत महत्वाचे बदल करुन वाढलेल्या  इस्ट्रोजेनमुळे होणारा त्रास कमी करता येतो तसेच इस्ट्रोजेन हार्मोन संतुलित ठेवण्यास मदत होते. 

आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहाण्यासाठी शरीरातील हार्मोन्स संतुलित (balanced hormones)  असणं आवश्यक आहे. शरीरातील हार्मोन्स कमी जास्त झाल्यास अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात. इस्ट्रोजेन हे महिलांच्या शरीरातील हार्मोन (estrogen)  तर टेस्टोस्टेराॅन हे पुरुषांच्या शरीरातील हार्मोन म्हणून ओळखलं जातं. खरंतर दोन्ही हार्मोन्स महिला आणि पुरुषांच्या शरीरात असतात मात्र इस्ट्रोजेन हे हार्मोन महिलांच्या शरीरात अधिक तर टेस्टोस्टेराॅन हे हार्मोन पुरुषांच्या शरीरात अधिक असतं. इस्ट्रोजेन हार्मोनमुळे महिलांच्या शरीरात लैंगिक विकास घडून येतो. पण जर हे इस्ट्रोजेन जास्त प्रमाणात वाढल्यास ( high estrogen effects)   त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वेगवेगळे परिणामही जाणवतात. इस्ट्रोजेन हे हार्मोन वाढल्यावर महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम दिसतात आणि हे वाढलेलं हार्मोन कमी करायचं असल्यास कोणते उपाय (solutions for reduce high estrogen level )  करावेत याबाबत स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ. रितु गर्ग यांनी मार्गदर्शन केल आहे. 

Image: Google

महिलांच्या शरीरात जेव्हा इस्ट्रोजेन  वाढतं तेव्हा..

इस्ट्रोजेन हार्मोन महिला आणि पुरुषांच्या शरीरात लैंगिक विकास, प्रजनन क्रिया यात  महत्त्वाची भूमिका बजावतं. महिलांच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत इस्ट्रोजेन हे हार्मोन अधिक असतं पण ते प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर त्याचे परिणाम आरोग्यावर दिसून येतात. इस्ट्रोजेन वाढण्याची पुढील लक्षणं जाणवतात. 

1. वजन वाढणं

2. लैंगिक इच्छा कमी होणं. 

3. झोप न येणं, अनिद्रेची समस्या जाणवणं.

4. केस गळणं.

Image: Google

5. मूड सतत बदलत राहाणं. अति राग येणं, डोकं दुखणं.

6. नैराश्य येणं, थकवा जाणवणं. तणाव आणि चिंता या समस्या जाणवणं.

7. स्तन हुळहुळे होणं. संवेदनशील होंणं.

8 पाळी अनियमित होणं.

9. हात पाय थंड पडणं.

Image: Google

इस्ट्रोजेन वाढल्यास काय कराल?

शरीरातील इस्ट्रोजेनचा स्तर नियंत्रित राखण्यासाठी, वाढलेलं इस्ट्रोजेन कमी करण्यासाठी डाॅ.रितु गर्ग जीवनशैली आणि आहारात पुढील बदल करण्यास सूचवतात.

1. शरीरात इस्ट्रोजेनचा स्तर अधिक झालेला असल्यास आहारात बदल करुन लो फॅट आहाराचा समावेश करावा. भाज्यांमध्ये क्रूसीफेरस वर्गातल्या भाज्या जसे कोबी, फ्लाॅवर, ब्रोकोली यांचा समावेश करावा. गाजर, जवस आणि सोयाबीन यांचाही आहारात समावेश करावा. 

2. फायबरयुक्त आहार इस्ट्रोजेन संतुलित ठेवण्यास मदत करतो. आहारातील फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी आहारात फळं, भाज्या यांचा समावेश करावा. फळं आणि भाज्यांमध्ये फायबरप्रमाणेच ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाणही जास्त असतं. 

3. शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचा स्तर वाढल्यास वजन वाढतं. ते कमी करण्यासाठी आहारात लो फॅटस आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. आहारातील या दोन घटकांमुळे वजन नियंत्रणात राहाण्यास मदत होते. आहारासोबत नियमित  व्यायाम आणि योग साधना केल्यास वजन कमी होतं आणि इस्ट्रोजेन हार्मोनही नियंत्रणात येतं.  

4. शरीरात इस्ट्रोजेनचा स्तर वाढलेला असल्यास पॅकेज्ड फूड, मैदा, मैद्याचे पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. तसेच चहा काॅफी पिण्याचं प्रमाणही एकदम कमी करावं. 

5. ताण तणाव न घेता, चिंता सोडून देऊन जास्तीत जास्त आनंदी राहाण्याचा प्रयत्न करावा. आनंदी राहाण्याचा परिणाम हार्मोन्सवरही होतो. ताण घेतल्यास, तणावात राहिल्यास हार्मोन्स असंतुलित होतात. यासाठी ताण न घेता आनंदी राहाणं जास्त महत्वाचं असतं. आनंदी राहंण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा. 

Web Title: What happen if estrogen level high in women's body? High estrogen symptoms and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.