तुम्ही जे काही खाता पिता याचा शरीरावर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह परीणाम होतो. कोणतीही वस्तू तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ली तर तिचा फायदा होईल. अत्याधिक प्रमाणात खाल्ल्यास तब्येतीला नुकसान पोहोचू शकते. मग ते फळं असो किंवा भाज्या. काही लोकांना स्वंयपाकात मीठ खायला खूप आवडत तर काहींना गोड पदार्थ आवडतात. (What Happen If Your Stop Eating Sugar For 30 Days)
जर तुम्ही एका दिवसात भरपूर प्रमाणात साखरेचं सेवन करत असाल तर आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. रिफाईंड शुगर, ब्राऊन शुगर आरोग्यासाठी हानीकारक ठरते. एक महिना साखर खाल्ली नाही तर शरीराला काय फायदे मिळतील, रोजचं साखरेचं प्रमाण किती असायला हवं याबाबत क्लिनिकल डायटिशियने एक सोपा उपाय सुचवला आहे.
साखर खाणं सोडल्यानं काय होतं? (What Happen When You don't Eat Fugar
साखर खाणं सोडल्याने शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही पण असं केल्याने भरपूर फायदे मिळतील. तुमचं वाढलेलं वजन कमी होऊ शकतं. कारण साखरेत कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुम्ही गंभीर आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता. कारण साखरेत कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. वेगवेगळ्या प्रकारच्या शरीराच्या समस्या टाळता येतात. साखर न खाल्ल्याने किंवा साखर कमी प्रमाणात खाल्ल्याने दात हेल्दी राहतात. जर कोणालाही शुगर किंवा हार्ट डिसीज असतीर तर साखरेचं सेवन कमी करायला हवं. काही लोकांना गोड खाण्याचे क्रेविंग होते.
रिफाईंड व्हाईट साखर, ब्राऊन शुगर सर्व साखरेचे प्रकार अन्हेल्दी आहेत. अनेकजण साखर थेट खात नाहीत. चहा, कॉफी, गोड पदार्थ, ड्रिंक्समध्ये मिसळून खातात. साखरेला पर्याय म्हणून खजूर, फळं खाऊ शकता. यामुळे नैसर्गिक पदधतीने साखर मिळते. ज्यामुळे शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही. आजच्या लोकांना खासकरून तरूणांना खाण्यापिण्यावर अजिबात कंट्रोल नसतो. काहीही खाणं, अन्हेल्दी प्रोसेस्ड फूड्, कुकीज पेस्ट, याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वजन वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा होतो.
एका दिवसाला किती साखर खावी?
जर तुम्हाला गोड खाणं खूप आवडत असेल तर दिवसभरातून २ ते ३ चमचे साखरेचं सेवन करा. ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गोड पदार्थांचे अतिसेवन करू नये. एक छोटा चमचा रोज साखर खा, हार्ट, किडनी, डायबिटीसच्या रुग्णांनी हेल्दी डाएट करायला हवं. ज्यामुळे शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही.