पाणी आरोग्यासाठी आवश्यक आहेच, पण ते कधी आणि किती प्रमाणात प्यायचे हेही माहित असणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे पाण्याचे जास्तीत जास्त सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ज्ञ भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी न पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. पण पाणी पिण्याची देखील एक ठराविक वेळ आहे.
बरेच जण जेवल्यानंतर किंवा आंघोळीनंतर लगेच पाणी पितात (Health Tips). पण आंघोळ केल्यानंतर लगेच पाणी पिणे कितपत योग्य आहे? यासंदर्भात, नोएडास्थित राज हॉस्पिटलचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. व्ही.के सिंह यांनी आंघोळीनंतर लगेच पाणी प्यावे की टाळावे? याबद्दल माहिती दिली आहे(What happens to body if we drink water after bathing).
आंघोळ केल्यानंतर का लागते तहान?
तज्ज्ञांच्या मते, आंघोळीनंतर लगेच तहान लागण्याचे कारण म्हणजे शरीराच्या बाह्य आणि अंतर्गत तापमानातील फरक. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर लगेच तहान लागते. पण आंघोळ केल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
थ्रेडिंग नको वाटतं? लिंबाच्या रसात मिसळा २ गोष्टी, चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्याची सोपी ट्रिक
आंघोळ केल्यानंतर पाणी पिऊ नये कारण?
डॉ.व्ही.के. सिंह सांगतात, आंघोळीनंतर लगेच पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. कारण आंघोळ करताना शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढते. अशा स्थितीत ताबडतोब पाणी प्यायल्यास त्याचा रक्तावर अतिरिक्त दबाव पडतो आणि रक्तदाब असंतुलित होऊ शकते. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. त्या व्यतिरिक्त काही काळानंतर पाणी प्यावे.
या क्रिया केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.
- आंघोळी व्यतिरिक्त जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रियेत अडथळे येतात. यासह पोटाचे विकार वाढतात. शिवाय आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. जेवल्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनीच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
महागडे सिरम सोडा - रात्री झोपताना लावा ‘या’ २ पैकी १ तेल; चेहरा दिसेल कायम फ्रेश-चमकदार
- त्याच बरोबर बाहेरून आल्यावर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. यामुळे शरीराच्या अंतर्गत तापमानात अचानक बदल होतो जे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.