Join us   

महिनाभर मीठ सोडल्यानं वजन कमी होते, हे खरं की..? मीठ नेमकं किती खाणं फायद्याचंच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2024 6:04 PM

What happens to the body when you give up salt for a Month : मीठ कमी किंवा सोडल्यानं वजनावर फरक पडतो का?

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा अवलंब करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटला फॉलो करतो. परंतु, प्रत्येक वेट लॉस फंडा उपयुक्त ठरेलच असे नाही. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट (Diet) फॉलो करणं गरजेचं आहे. पण तरीही वजन कमी होत नसेल तर, आहारात काही बदल करून पाहणं गरजेचं आहे.

बरेच जण वेट लॉससाठी आहारातून मीठ (Salt) वगळतात. मिठामुळे पदार्थाची चव वाढते. पण वेट लॉससाठी मीठ सोडणं गरजेचं आहे का? आहारातून मीठ वगळल्याने वजन कमी होते का? यासंदर्भात, आरोग्य प्रशिक्षक कपिल कनोडिया यांनी एक व्हिडिओ शेअर केलं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मीठ सोडल्यानं वजन कमी होते कां? याची माहिती दिली आहे(What happens to the body when you give up salt for a Month).

मीठ सोडल्याने वजन कमी होण्यास मदत होते का?

तज्ज्ञांच्या मते, 'आहारातून मीठ वगळल्याने वजन झपाट्याने कमी होते. पण ही पद्धत जितकी झटपट वजन कमी करण्यास मदत करते तितकीच ती आरोग्यासाठी हानिकारक आहे. मीठ शरीरातील पाणी टिकवून ठेवते. त्यामुळे मीठ अधिक वेळ न खाल्ल्यास शरीरातील पाणी कमी होते.'

मीठ सोडल्यानं शरीराचे नुकसान होऊ शकते का?

रक्तदाब असंतुलित

शरीरात मीठ रक्तदाब राखण्यास मदत करते. पण मीठ अचानक सोडल्यामुळे हळूहळू पाणी शरीरातून बाहेर पडू लागते. यामुळे रक्तदाब असंतुलन होऊ शकते.

ना भाजी शिजवण्याची गरज - ना फोडणी; अगदी एका शिट्टीत प्रेशर कुकरमध्ये करा चमचमीत पावभाजी

पाण्याचे प्रमाण बिघडते

मीठ शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासही मदत करते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.

स्नायूंच्या आरोग्यास नुकसान

आहारातून मीठ पूर्णपणे वगळल्यास स्नायूंच्या आरोग्यास नुकसान पोहचते. यामुळे, स्नायूंमध्ये वेदना कायम राहतात. अशा परिस्थितीत, स्नायूंच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

खराब पचन

आहारातून पूर्णपणे मीठ वगळल्याने पचनक्रियाही बिघडते. यामुळे चयापचय मंदावते. मंद चयापचयमुळे वजन कमी करण्यास अडचण निर्माण होते. ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न