भारतीयांच्या आहारात पोळी - भाजी हमखास असतेच (Chapati - Bhaji). पोळी - भाजी खाण्याचे अनेक फायदेही आहेत (Wheat Flour). विविध प्रकारच्या भाजीमधून आपल्या शरीराला विविध पौष्टीक घटक मिळतात. गव्हाच्या पोळीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते. पण जर आपल्याला वेट लॉस करायचा असेल तर, गव्हाची पोळी कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला मिळतो.
यासह जे मधुमेहग्रस्त आहेत, त्यांनी देखील कमी प्रमाणात गव्हाची पोळी खावी. गव्हातील ग्लुकोजमुळे ब्लड शुगर वाढते. जे मधुमेहींच्याआरोग्यासाठी योग्य नाही. पण जर महिनाभर पोळी खाल्ली नाही तर, आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात? यातून शरीराला फायदे होईल की नुकसान? महिनाभर गव्हाच्या पीठाचे पदार्थ न खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात?(What happens to the body when you give up wheat for a month?).
महिनाभर गव्हाच्या पीठाचे पदार्थ न खाण्याचे फायदे
वजन नियंत्रित
गव्हाच्या पीठामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत गव्हाच्या पीठाचे पदार्थ न खाल्ल्याने शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी होतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दिवाळीत 'ही' पौष्टीक भाजी खायलाच हवी, सुटलेलं पोट - वजनही होईल कमी; मधुमेहींसाठीही फायदेशीर
पचनक्रिया सुधारेल
अनकेदा गव्हाच्या पीठाचे पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्था बिघडते. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. काहींना पोटाचाही त्रास होतो. त्यामुळे महिनाभर गव्हाच्या पीठाचे पदार्थ न खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते.
ग्लूटेनमुक्त
गव्हाच्या पिठामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. जर शरीराला ग्लूटेनमुक्त ठेवायचं असेल तर, महिनाभर गव्हाचे पदार्थ खाणं टाळा. ज्यांना सेलिआक रोगग्रस्त आहेत, त्यांनी महिनाभर गव्हाच्या पदार्थ खाणं टाळून पाहावे. यामुळे नक्कीच आरोग्याला फायदा होईल.
दिवसभर वाटेल एनर्जेटिक
महिनाभर गव्हाचे पदार्थ न खाल्ल्याने शरीर ग्लूटेनमुक्त राहील. शिवाय उर्जा पातळीही वाढेल. त्यामिले याचा फायदा आरोग्याला नक्कीच होईल.
दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन
ब्लड शुगर राहील नियंत्रित
गव्हाचे पीठाचे पदार्थ खाल्ल्याने ब्लड शुगर झपाट्याने वाढते. जर आपण महिनाभर गव्हाचे पदार्थ खाल्ले नाही तर, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. जे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.