Join us   

फक्त १ महिना गव्हाची पोळी नाही खाल्ली तर...? वजन कमी होते? नक्की खरं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 10:00 AM

What happens to the body when you give up wheat for a month? : महिनाभर गव्हाची पोळी नाही खाल्ली तर शरीरात कोणते बदल घडतील?

भारतीय घरांमध्ये दररोज पोळी केली जाते (Wheat Chapati). पोळी -भाजी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गव्हाची पोळी हे कॉमन आहे. काही जण चपाती, रोटी किंवा फुलके म्हणतात. गव्हाची पोळी खाण्याचे अनेक फायदे आहेत (Wheat Flour). तसेच याचे काही तोटेही आहेत.  नियमित डब्याला आपण पोळी नेतो. पण जर आपण महिनाभरासाठी पोळी खाल्ली नाही तर?

काही अभ्यासांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार डायबिटीज रुग्णांसाठी गव्हाचे सेवन हे नुकसानदायक असल्याचे समोर आले आहे. शिवाय वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही गव्हाची पोळी ही सर्वात योग्य पर्याय नाही. पण आहारातून पूर्णपणे गहू वगळावे का? एक महिना गहू न खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होऊ शकतात?(What happens to the body when you give up wheat for a month?).

ब्लड शुगर राहील स्थिर

गहू  हा शरीरातील ग्लुकोजचा प्रमुख स्रोत आहे. आहारातून गहू पूणर्पणे वगळून टाकल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ शकते. जे विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त आहे. ग्लूटेनचा त्रास असणाऱ्या आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी मदत होईल.

पचन सुधारणे

कोरियन मुली तांदुळाच्या पाण्याचा करतात 'असा' वापर; तुकतुकीत - चमकती त्वचा हवी असेल तर..

गव्हात  कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांसंबंधीत समस्या किंवा पचनक्रिया मंद होऊ शकते. ज्यामुळे गॅस, पोटदुखी, उलट्या, आणि पोटाचे विकार वाढू शकतात. अशा परिस्थितीत गहू न खाल्ल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत

व्हाईट ब्रेड, पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारख्या प्रोसेस्ड कार्ब्सचा वजनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रिफाईंड गव्हापासून तयार पदार्थ वेट गेन करतात. याशिवाय हे पदार्थ खाल्ल्याने वारंवार भूकही लागते. त्यामुळे जर वजन कमी करायचे असेल तर, हे पदार्थ खाणं बंद करा. ज्यामुळे कॅलरीज इनटेक कमी होईल आणि वेट लॉस होईल.

फराळाचे पदार्थ तळण्यासाठी कोणते तेल योग्य? तज्ज्ञ सांगतात, ‘हे’ तेल योग्य- वाढत नाही वजन

गव्हाला पर्याय काय?

आपण क्विनोआ, ओट्स, ब्राऊन तांदूळ किंवा ज्वारी - बाजरीचे पदार्थ खाऊ शकता. 

टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य