फ्रुट ज्यूस पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. फ्रुट ज्यूस प्यायल्याने शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरसारखे पौष्टीक घटक मिळतात. बाजारात ज्यूस दोन प्रकारचे मिळतात. पॅक्ड फ्रूड ज्यूस, आणि ठेल्यावरील तयार फ्रेश ज्यूस सर्वत्र मिळतात. मात्र, दररोज पॅक्ड फ्रूड ज्यूस प्यायल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडू शकतात. पॅक्ड फ्रूड ज्यूसमध्ये अधिक गोड चव यावी, यासाठी त्यात एडेड शुगर आणि प्रिर्झवेटिव्हजचा वापर करण्यात येतो. मात्र, या दोन्ही घटकांमुळे शरीरात १० गंभीर आजार निर्माण होऊ शकतात(What Happens to Your Body When You Drink Packed Juice Everyday).
ग्रेटर नोएडास्थित जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या, आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी पॅक्ड फ्रूड ज्यूस प्यायल्याने शरीरात कोणते आजार निर्माण होऊ शकतात, याबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 'पॅक्ड फ्रूड ज्यूस प्यायल्याने शरीरात १० आजार निर्माण होऊ शकतात. पॅकेजमध्ये विकल्या जाणार्या रसांमध्ये कमी फायबर आणि भरपूर साखर असते. ज्यामुळे इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. त्यामुळे पॅक्ड फ्रूड ज्यूस पिण्याऐवजी, घरात ज्यूस तयार करून पिणे उत्तम ठरू शकते.'
पाकिटबंद ज्यूस प्यायल्याने होतील १० आजार
१. मधुमेह
२. हृदयरोग
३. डिमेंशिया
४. अल्झायमर
ऐन तारुण्यात हार्ट ॲटॅक येतो कारण ५ हमखास होणाऱ्या लाइफस्टाइल चुका, तुम्हीही असंच वागताय का?
५. उच्च कोलेस्ट्रॉल
६. हाय ब्लड प्रेशर
७. किडनी डिसीज
८. लठ्ठपणा
९. त्वचा वृद्ध होणे
१०. दात किडणे
सतत भूक लागते, खाल्लं की झोप येते? हा ‘फूड कोमा’ तर नाही, पाहा ते काय असते..
घरगुती फ्रुट ज्यूस तयार करून प्या
आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्या मते, 'फळ मूळ स्वरूपात खावे. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात. जर आपण लिक्विड डाएटमध्ये असाल तर, घरात फळांचा ज्यूस तयार करून प्या. फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे त्यात साखर मिसळण्याची गरज नाही. ठेल्यावरील ज्यूस पिणे टाळा, त्यात कोणत्या प्रकारची फळं वापरण्यात येते, हे आपल्याला ठाऊक नसते. म्हणून डोळ्यादेखत घरीच फ्रुट ज्यूस तयार करून पिणे उत्तम ठरू शकते.