Join us   

लसूण कच्चा खावा की भाजलेला? आहारतज्ज्ञ म्हणतात ४ गोष्टींसोबत खा; मिळतील फायदेच - फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 5:58 PM

What Happens to Your Body When You Eat Garlic Regularly : लसूण भाजून खाण्याचे फायदे अनेक; ४ गोष्टींसोबत खा - आरोग्य राहील सुदृढ

मसाल्यांमध्ये लसूण आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ (Garlic). फोडणीमध्ये लसूण घालताच त्याची चव दुपट्टीने वाढते (Health Tips). काही जणांना पदार्थामध्ये लसूण लागतेच, तर काही जण लसूण खाताना नाक मुरडतात. लसूण खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण लसूण भाजून खावा की कच्चा? लसूण कसा खाल्ल्याने आरोग्याला फायदे मिळतात? हे अनेकांना ठाऊक नसतं.

लसणामध्ये मँगनीज, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबरसारखे पोषक तत्वे असतात. इवल्याश्या लसणामुळे आरोग्य चांगले राहते. लसणाबद्दल आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल सांगतात, 'लसूण भाजल्याने त्यातील पोषकतत्त्वे वाढते.

यामुळे खोकला, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. जर शरीराला अधिक पौष्टीक घटक मिळावे असे वाटत असेल तर, काही खाद्यपदार्थांसोबत लसूण खा'(What Happens to Your Body When You Eat Garlic Regularly).

क्विनोआ किंवा ब्राऊन राईस

क्विनोआ किंवा ब्राऊन राईसमध्ये आपण लसूण घालू शकता. या धान्यांमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे लसणाच्या आरोग्याच्या फायद्यांसोबतच दीर्घकाळ भूक भागवते.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

दही

भाजलेले लसूण आपण दह्यामध्ये घालून खाऊ शकता. फोडणीमध्ये लसूण घालून दह्यामध्ये मिक्स करा. आपण हे दही चपाती किंवा विविध भाज्यांसोबत खाऊ शकता. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

ऑलिव्ह ऑइल किंवा एवोकॅडो

एवोकॅडो मॅश करून त्यात भाजलेले लसूण घाला. एवोकॅडो आणि लसणातील गुणधर्म आरोग्याला फायदे मिळतील.

रताळे किंवा बटाटे

मॅश केलेले रताळे किंवा बटाट्यामध्ये भाजलेले लसूण घालून खा. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

हिरव्या पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये लसणाची फोडणी घालून खाऊ शकता. पालेभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य