मोबाईल फोन ही सध्याच्या जमान्यात काळाची गरज होत चालली आहे. आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल फोनचा वापर करतात. एवढेच नव्हे तर रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतरही लोक फोनचा वापर करतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळी उठल्या उठल्या अंथरुणात बसून मोबाईल फोन बघण्याची सवय असते. परंतु खरं तर सकाळी उठल्यावर सर्वात आधी फोन तपासून पाहणे हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
आपली रोजची कामे जितकी या मोबाईलमुळे सोपी झाली आहेत, तेवढ्याच आरोग्याच्या काही समस्या या मोबाईलमुळे वाढल्या आहेत. मोबाईलवर सतत व्हिडीओ बघणे, गेम खेळणे, सोशल मीडिया चेक करणे, गाणी ऐकणे यांसारख्या अनेक गोष्टींसाठी मोबाईल फोनचा सतत वापर केला जातो. ज्या लोकांना सकाळी सर्वात आधी फोन चेक करण्याची सवय असते, ते फोन उशीवर ठेवून झोपतात. ज्यामुळे खूप नुकसानही होते. विशेषतः मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सर आणि ट्यूमरसारखे जीवघेणे आजार होण्याची शक्यता वाढते. त्याच वेळी, सकाळी सर्वात आधी फोन तपासल्याने आपल्याला इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात(What happens to your body when you look at your phone first thing in the morning?).
सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल फोन चेक केल्याने नेमके काय होते ?
१. स्ट्रेस वाढू शकतो :- जे लोक सकाळी सर्वात आधी त्यांचा मोबाईल फोन तपासतात ते नोटिफिकेशन्स, ईमेल्स किंवा सोशल मीडिया अपडेट्समधील अनेक मेसेजेसमुळे अनावश्यकपणे तणावात सापडतात. अशा परिस्थितीत आपल्या मनाची नकारात्मकता वाढू शकते आणि त्यामुळे आपण विनाकारण अस्वस्थ होऊ शकता. सकाळी झोपेतून उठल्यावर मोबाईल पाहिल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर याचा प्रभाव पडतो यामुळे दिवसाची सुरुवात खराब होऊ शकते. जेव्हा आपण सकाळी मोबाईल फोन तपासता तेव्हा आपल्याला अनेक नकारात्मक संदेश देखील मिळतात. त्यामुळे आपला मूड ऑफ देखील होऊ शकतो आणि नकारात्मक भावना येतात. ज्याचा आपल्या एकूण आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक भावना आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात त्यामुळे याचा आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.
५ पैकी फक्त १ गोष्ट रोज करा, दिवसभर राहाल आनंदी-हॅपी हार्मोन्सचं संतुलन...
२. एकाग्रता कमी होते :- सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वातआधी मोबाईल चेक करणे आणि होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करणे यामुळे येणाऱ्या दिवसात आपल्या आपली एकाग्रता कमी झालेली जाणवते. एकाग्रता कमी झाल्याने दिवसभरातील आपण जी कामे करतो, जसे की ड्रायव्हिंगपासून ते थेट ऑफिसमध्ये काम करण्यापर्यंतच्या कामात आपल्याला एकाग्रतेची कमी जाणवते.
सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...
३. डोके आणि मान दुखणे :- सकळी उठल्या उठल्या मोबाईलचा भरपूर वापर होतो आणि त्याच स्थितीत बराच वेळ बसून काम करतात. त्यामुळे डोके आणि मान दुखण्याची शक्यता वाढते. २० ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये मणक्याशी संबंधित समस्या अधिक दिसून येत आहे.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
४. झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो :- चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे असते. परंतु जे लोक सकाळी सर्वातआधी त्यांचा फोन तपासतात त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवरही नकारात्मक परिणाम होतो. वास्तविक, फोन स्क्रीनमधून निघणारे रेज मेलाटोनिन हार्मोन्सच्या उत्पादनात अडथळा निर्माण करतात. हा हार्मोन झोपेचे नियमन करण्यास मदत करतो. सकाळी जर आपण फोन प्रथम तपासल्याने आपल्याला या प्रकाशात जास्त घालवल्याने रात्री उशिरा झोप लागणे कठीण होऊन बसते.
या उपायांचे पालन करा :-
१. रात्री झोपताना मोबाईल बेडरूमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा.
२. नाश्त्याच्या टेबलावर मोबाईल अजिबात वापरू नका.
३. रात्री फोनचे इंटरनेट बंद करून झोपा.
४. सकाळी सर्वप्रथम मोबाईलचे इंटरनेट सुरु करणे टाळा.