उन्हाळ्यात काकडीचे सेवन अधिक प्रमाणात होते. काकडी शरीराला थंडावा देते. काकडीचे अनेक प्रकार केले जातात. काकडीची कोंशिबीर, चटणी, सॅलेड तसेच सूपमध्ये सुद्धा याचा वापर होतो. एवढंच नाही तर, काकडी त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. काकडीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
काकडीचे फायदे त्याच्या प्रमाणावर आणि वेळेवर अवलंबून असतात. काकडी खाण्याची सुद्धा एक ठराविक वेळ आहे. चुकीच्या वेळेस काकडी खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी, काकडी कोणत्या वेळी खाणे टाळावे याबाबतीत माहिती दिली आहे(What happens when you eat cucumber at night?).
यावेळी काकडी खाऊ नका
डॉ आयुषी यांच्या म्हणण्यानुसार, ''काकडी आरोग्यासाठी सर्वच बाबतीत फायदेशीर असली तरी, ती नेहमी दिवसा खावी. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे पोषकतत्त्वे मिळतात. जर रात्रीच्या वेळेस काकडी खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.''
रात्री काकडी का खाऊ नये
पचनावर परिणाम
काकडीत कुकुरबिटासिन असते, आपली पचनसंस्था मजबूत असेल तरच काकडी पचवता येते. अन्यथा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. रात्री काकडी खाल्ल्याने पोट जड होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच दिवसा काकडी खा.
वजन कमी करायचे म्हणून चपाती खाणे बंद केले? तज्ज्ञ सांगतात की नेमका तोटा झाला की फायदा..
झोपेवर परिणाम
काकडी रात्रीच्या वेळी खाल्ल्याने पोट जड होते. व गॅसेसचा त्रास होतो. ज्यामुळे नीट झोप लागत नाही. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने रात्री वारंवार लघवी येते. ज्यामुळे नीट झोप पूर्ण होत नाही.
चुकूनही शिजवून खाऊ नयेत असे ५ पदार्थ, न्यूट्रिशन जातं उडून- पोटासाठीही त्रासदायक
दिवसा काकडी खा
बहुतांश आरोग्य तज्ज्ञ काकडी दिवसा खाण्याचा सल्ला देतात. कारण काकडीच्या संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे शरीराला मिळतात. काकडीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते, त्यामध्ये असलेल्या ९५% पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.