आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. तिला औषधी वनस्पतींची राणी म्हणतात. तुळशीचा वापर वर्षानुवर्षे घरगुती उपचारांसाठी केला जात आहे. जर एखाद्याला खोकला असेल तर सर्वात आधी तुळशीची पानं खाल्ली जातात. अनेक आरोग्य समस्यांवर तुळस गुणकारी ठरते. जर तुम्ही १० दिवस उपाशी पोटी तुळशीची पानं खाल्लीत तर तुम्हाला अनेक जबरदस्त फायदे मिळू शकतात. दररोज उपाशी पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात कोणते बदल होतात? याबद्दल जाणून घेऊया...
तुळशीची पानं खाण्याचे फायदे
- तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळे सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
- तुळशीमध्ये एंजाइम असतात जे पाचक रस एक्टिव्ह करतात. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
- तुळशीची पानं खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. त्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते.
- चिंता आणि ताण कमी होते. त्यात एडेप्टोजेनिक गुणधर्म आहेत, जे मन शांत ठेवतात.
- तुळशीची पानं खाल्ल्याने तुमचं हृदय निरोगी राहतं. कोलेस्टेरॉल कमी होतं, जे ब्लड प्रेशर नियंत्रित करते आणि त्यामुळे हृदयाच्या आरोग्यालाही फायदा होतो.
कशी खायची तुळशीची पानं?
- दररोज सकाळी उपाशी पोटी ४ ते ५ तुळशीची पानं चावून खा.
- तुळशीचं पाणी प्या. यासाठी तुळशीची पानं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते प्या.
- तुळशीचा चहा पिणं देखील फायदेशीर आहे.