Join us   

फक्त १ महिना चहा पिणं सोडा; शरीरात दिसतील ५ पॉझिटिव्ह बदल, पचनक्रिया चांगली राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 3:23 PM

What Happens When You Stop Consuming Tea For A Month : जर तुम्ही एक महिना चहा प्यायला नाही तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.

भारतभरातील अनेक लोकांच्या सकाळची सुरूवात सकाळी एक कप चहा पिऊन होते. कोणाच्याही घरी गेल्यानंतर चहा बिस्किट्स किंवा नुसता चहा दिला जातो.  काही लोकांना चहा पिण्याची इतकी आवड असते की ते दिवसभर चहा पिऊ शकतात. रात्री झोपण्याच्याआधी चहा पिऊनच झोपतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. महिन्याभर चहा सोडल्याने तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. याबाबत सविस्तर समजून घ्यायला हवं. (What Happens When You Stop Consuming Tea For a Month Know About These Changes)

१) स्ट्रेसपासून सुटका मिळेल

चहात भरपूर प्रमाणात कॅफेन असते. ज्यामुळे चिंताग्रस्तता वाढते. झोप यायला त्रास होतो. अशा स्थितीत जर तुम्ही एक महिना चहा सोडली तर स्ट्रेस लेव्हल कमी होईल आणि झोपेची समस्याही उद्भवणार नाही. 

२) पचनक्रिया चांगली राहते

जास्त चहा प्यायल्याने पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. अशा स्थितीत जर तुम्ही एक महिना चहा प्यायलात नाही तर एसिडीटी, गॅसचा त्रास वाढू शकतो. याशिवाय इतर दुखणीही उद्भवतात. 

वजन वाढलंय-व्यायामानेही कमी होईना? आहारतज्ज्ञ सांगतात २१ दिवसांत ४ किलो घटवण्याचं खास डाएट

३) चांगली झोप येण्यास मदत होते

अतिप्रमाणात चहाचे सेवन आपल्या झोपेवर परिणाम करते. अधिक प्रमाणात चहा प्यायल्याने झोपेवर परिणाम होतो. चांगली झोप येण्यासाठी एक महिना चहा पिऊ नका. झोपेची गुणवत्ता चांगली होईल. झोपण्याच्या काही तास आधी चहा घेणं टाळा. कारण कॅफेनमुळे झोप यायला त्रास होतो. 

४) डिहायड्रेशनची समस्या टाळता येते

जर तुम्ही एक महिना चहा प्यायला नाही तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल. कारण कॅफेन शरीरातील पाणी खेचून घेते ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवते.

चपात्या तव्यावरून काढताच कडक-वातड होतात? कणकेत 'हा' पदार्थ मिसळा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

५) एखाद्या गोष्टीवर फोकस करता येत नाही

जास्त चहा पिण्याची सवय असेल तर हळूहळू तुमची एकाग्रता कमी होऊ शकते. डोकेदुखीचा त्रास वाढतो. जर तुम्हाला चहा प्यायला असेल तर तुम्ही दुधाच्या चहाऐवजी हर्बल चहाचे सेवन करू शकता. जर १ महिना चहाचे सेवन केले नाही तर शरीरात हे बदल दिसतील. 

टॅग्स : हेल्थ टिप्सअन्नफिटनेस टिप्स