Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मसालेदार पदार्थ खाल्ले की पोटात सतत जळजळ होते ? खा ५ पदार्थ, जळजळ होईल कमी...

मसालेदार पदार्थ खाल्ले की पोटात सतत जळजळ होते ? खा ५ पदार्थ, जळजळ होईल कमी...

5 Stomach-Burning Home Remedies You Must Try : वाढलेलं पित्त, छातीत जळजळ यासाठी सतत औषध घेण्यापेक्षा सोपे घरगुती उपाय करुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2023 07:20 PM2023-10-03T19:20:05+5:302023-10-03T19:40:26+5:30

5 Stomach-Burning Home Remedies You Must Try : वाढलेलं पित्त, छातीत जळजळ यासाठी सतत औषध घेण्यापेक्षा सोपे घरगुती उपाय करुन पाहा...

What Helps Settle Your Stomach After Eating Spicy Food? Home Remedies for Relief. | मसालेदार पदार्थ खाल्ले की पोटात सतत जळजळ होते ? खा ५ पदार्थ, जळजळ होईल कमी...

मसालेदार पदार्थ खाल्ले की पोटात सतत जळजळ होते ? खा ५ पदार्थ, जळजळ होईल कमी...

पोटासंबंधित अर्धेअधिक आजार हे आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळेच होतात. रोजच्या आहारामध्ये जर आपण अधिक तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर आपल्याला अपचन, अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो. याचबरोबर जर आपण चुकीच्या कॉम्बिनेशनचे पदार्थ एकत्र खाल्ले तरीही आपलयाला पोटाचे विकार होतात. आपल्यापैकी काहीजणांना पचायला हलके, कमी तेलकट, कमी मसालेदार असे साधे अन्नपदार्थ खाण्याची सवय असते. यासोबतच काही लोकांना रोजच्या जेवणात देखील अतिशय तिखट, मसालेदार अन्नपदार्थ खायला आवडतात. अशा स्थितीत आंबट ढेकर येणे, पोटदुखी आणि अस्वस्थता यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. परंतु सतत रोज असे पदार्थ खाल्ले तर काहींना पोटात जळजळ होऊ लागते(How to Stop Your Stomach from Hurting After Eating Spicy Foods).

काही पदार्थ खाल्ल्यामुळे छातीत जळजळ होते. ज्यात मसालेदार पदार्थ, आम्लयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ आणि कॅफीन यांचा समावेश होतो. काही खाद्यपदार्थांमुळे जर छातीत जळजळ होत असेल तर, ते पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करावा. यासोबतच पोटात जळजळीचा त्रास जास्त काळ होऊ नये (Stomach Burn Due To Spicy Food? What Can Help Relieve It) म्हणून घरगुती गोष्टींचा देखील वापर करता येतो. यामुळे आम्लपित्त कमी होण्यास आणि पोटातील उष्णता थंड होण्यास मदत होते. जाणून घेऊयात (What Helps Settle Your Stomach After Eating Spicy Food? Home Remedies for Relief) कोणत्या ५ घरगुती उपायांनी पोटांत होणाऱ्या जळजळी पासून कायमची सुटका मिळू शकते(5 foods to get rid of the burning sensation caused by spicy foods).

पोटांत होणारी जळजळ थांबविण्यासाठी सोपे घरगुती उपाय....  

१. थंड दूध प्या :- मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध घेऊ शकता. हायपर अ‍ॅसिडिटी कमी करून थंड दूध पोटाच्या जळजळीपासून आराम देऊ शकते. हे पोटात तयार होणारे ऍसिड शांत करते, ज्यामुळे पोटाच्या जळजळीपासून आराम मिळतो.

दिवसभरात १०,००० पाऊले चालले म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोकाच नाही, तज्ज्ञ सांगतात असं तुम्हाला वाटत असेल तर...

२. दह्यामुळे आराम मिळेल :- पोटात जळजळ होत असेल तर आपण थंड दही देखील खाऊ शकता. त्यामुळे पोटात तयार होणारे अ‍ॅसिड कमी होते. याशिवाय दह्यात व्हिटॅमिन - बी आणि लॅक्टिक अ‍ॅसिड देखील मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आराम मिळतो. मसालेदार किंवा तेलकट अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटांत जळजळ होत असल्यास, एक वाटी थंड दह्यात काळे मीठ मिसळून खाल्ल्याने आपल्याला आराम मिळेल. 

कितीही गोळ्या, औषध खाऊन अ‍ॅसिडिटी जात नाही ? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगते ४ सोपे उपाय...

३. ग्रीन टी प्या :- ग्रीन - टी मध्ये असलेले टॅनिन कंपाऊंड पोटातील अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करते. ग्रीन - टी प्यायल्याने बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, पोटात जळजळ, करपट ढेकर इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे जेवणानंतर एक तासाने ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. आपण दिवसातून दोन वेळा ग्रीन - टी पिऊ शकता. 

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

४. केळी खाणे फायदेशीर ठरेल :- केळीमध्ये असलेल्या आवश्यक गुणधर्मांमुळे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. बद्धकोष्ठता किंवा अ‍ॅसिडिटीच्या बाबतीतही केळी खाणे फायदेशीर मानले जाते. पोटात जळजळ होण्यास कारणीभूत घटकांना शांत करण्यासाठी केळं हे उपयुक्त ठरू शकते. 

५. पुदिन्याचे पाणी प्या :- पोटदुखी किंवा जळजळ रोखण्यासाठी पुदिना खाणे हा खूप जुना उपाय आहे. यासाठी आपण पुदिना पाण्यात घालून हे पाणी पिऊ  शकता. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटाची उष्णता शांत करण्यास मदत करतात. त्यामुळे पोटासंबंधित त्रास किंवा जळजळ होत असताना दिवसातून दोन वेळा आपण पुदिन्याचे पाणी पिऊ शकता.

Web Title: What Helps Settle Your Stomach After Eating Spicy Food? Home Remedies for Relief.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.