एखादा रुग्ण कोमामध्ये गेला आहे असे म्हटले की, सर्वांना काळजी वाटू लागते. कोमामध्ये गेलेला व्यक्ती कोणतीही कृती करत नाही. तसेच, त्या व्यक्तीचे झोपेचे चक्रही सुरू नसते. माणूस कोमामध्ये अनेक कारणांमुळे जातो. काही लोकं अनेक वर्षानंतर यातून बाहेर येतात. परंतु, पोटभर खाल्ल्यानंतरही माणूस कोमामध्ये जाऊ शकतो का? आता तुम्ही म्हणाल, पोटभर खाल्ल्यानंतर माणसाचं वजन वाढेल, किंवा जास्तीत जास्त पोट बिघडेल, पण पोटभर खाल्ल्यानंतर माणूस कोमामध्ये कसा जाऊ शकतो?
जगण्यासाठी जेवण हवेच. या शिवाय माणूस जगूच शकत नाही. यामुळे शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते. परंतु यामुळे बहुतासंह लोकं कोमासारख्या अवस्थेत जातात. मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा यांच्या मते, 'अनेक लोकं फूड कोमाचे बळी बनत आहेत. अन्न खाल्ल्यानंतर झोप येणे हे फूड कोमाचे सर्वात मोठे लक्षण आहे. जे सहसा दुपारच्या जेवणानंतर अधिक आढळते'(What Is a Food Coma? Food Coma Causes, Prevention Tips).
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
फूड कोमामुळे वजन वाढणे, थायरॉईडची समस्या, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल या समस्या निर्माण होऊ शकतात. खोकला अचानक वाढल्याने फूड कोमा होऊ शकतो. न्यूट्रिशनिस्टच्या मते, 'फूड कोमाची लक्षणे दिसू लागल्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.'
ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..
फूड कोमा झाल्यानंतर दिसतात ही लक्षणं
झोप लागणे
आळस
थकवा
उर्जेचा अभाव
लक्ष केंद्रित करण्यास अडचण
टोमॅटो सॉस खाण्याचे ५ दुष्परिणाम, वजन तर वाढेल, सोबत मधुमेहही होण्याचा धोका अधिक
मेडिकल साइन्सच्या मते..
मेडीकल साइन्समध्ये फूड कोमाला पोस्टप्रॅन्डियल सोमनोलेन्स असे म्हणतात. जे बऱ्याचदा जास्त अन्न खाल्ल्यानंतर होते. त्याला पोस्ट लंच डिप असेही म्हणतात. फूड कोमामुळे वारंवार जास्त खाणे, ब्लड सर्क्युलेशनमध्ये बदल, जास्त कार्ब, चरबी आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे, मेंदूवर अन्नाचा परिणाम आणि झोपेच्या हार्मोन्समध्ये बदल ही कारणे असू शकतात.